Samsung Smartphone Offers: ५ जी फोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. सॅमसंगच्या ‘Samsung Galaxy M53 5G’ या स्मार्टफोनवर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन उत्तम ऑफर देत आहे. काय आहे हा ऑफर सविसतर जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘Samsung Galaxy M53 5G’ या स्मार्टफोनवर विशेष ऑफर

६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ३२,९९९ रुपये आहे. कंपनी फोनवर २० टक्के सवलत देत आहे. सवलतीसोबतच, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फोनवर एक्सचेंज आणि बँक ऑफर देखील देत आहे.

डिस्काउंटनंतर हा स्मार्टफोन २६,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी एसबीआय क्रेडिट कार्डने व्यवहार करत असाल तर तुम्हाला २,५०० रुपयांचा झटपट कॅशबॅक देखील मिळेल. या दोन्ही ऑफरसह, फोनवर एकूण ९,००० रुपयांपर्यंत सूट दिली जाईल.

आणखी वाचा : Lava Blaze 5G: खुशखबर! देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री ‘या’ दिवशी सुरु होणार, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या…

Samsung Galaxy M53 5G ची वैशिष्ट्ये

या Samsung 5G फोनमध्ये १०८० × २४०० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.७ -इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले १२० Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देखील देत आहे. Samsung Galaxy M53 5G फोन ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. ५००० mAh मोठी बॅटरी उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये MediaTek Dimensity ९०० चिपसेट आहे.

कोणत्याही स्मार्टफोनमध्ये त्याचा कॅमेरा देखील खूप महत्त्वाचा भाग असतो, त्यामुळे या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला रियर क्वाड-कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यामध्ये १०८ एमपी प्रायमरी कॅमेरा, ८एमपी अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा, २ एमपी मॅक्रो सेन्सर आणि २ एमपी डेप्थ सेन्सरचा समावेश असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फोन ३२ एमपी फ्रंट शूटरसह येईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy m53 5g smartphone with a discount of up to 9 thousand rupees pdb