Samsung Galaxy S25 Launch Date : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय. लहान-मोठ्या उद्योजकांपासून बलाढ्य राष्ट्रांपर्यंत सर्वच जण या नव्या तंत्रज्ञानाकडे कुतूहलानं पाहतात. अनेक कंपन्यासुद्धा त्यांच्या नवनवीन उत्पन्नांमध्ये एआयचा समावेश करण्याकडे कल धरत आहेत, तर आता सॅमसंग गॅलॅक्‍सी कंपनीसुद्धा एआयसह एक पाऊल पुढे टाकणार आहे, ज्यामुळे दररोज जगाबरोबर परस्‍पर संवाद साधण्‍याच्‍या तुमच्या पद्धतीमध्‍ये बदल होणार आहे. म्हणजेच नवीन गॅलॅक्‍सी एस सीरिज एआयसह लाँच होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गॅलॅक्सी अनपॅक इव्हेंट या वर्षी २२ जानेवारी २०२५ रोजी कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे सकाळी १० वाजता किंवा ११ वाजून ३० मिनिटांनी आयोजित केला जाईल (भारतीय वेळ). हा मेगा इव्हेंट Samsung.com, Samsung Newsroom आणि त्याच्या अधिकृत YouTube चॅनेलवर लाइव्ह-स्ट्रीम केला जाईल, जो तुम्हालाही लाइव्ह पाहता येईल.

हेही वाचा…ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर

तर आता सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने त्यांच्या आगामी गॅलॅक्‍सी एस सीरिज (Galaxy S series ) स्‍मार्टफोनसाठी प्री-बुकिंग सुरू केलं आहे. नवीन गॅलॅक्‍सी एस सीरिज मोबाइल एआयमधील नवीन चॅप्‍टरचे अनावरण करेल, ज्‍यामधून प्रीमियम गॅलॅक्‍सी इनोव्‍हेशन्‍स सादर केले जातील, जे तुमच्‍या जीवनातील प्रत्‍येक क्षणामध्‍ये तुमची मदत करतील, तुम्हाला सोयीसुविधा पुरवतील.

ग्राहक Samsung.com, सॅमसंग एक्‍सक्‍लुझिव्‍ह स्‍टोअर्स आणि भारतभरातील आघाडीच्‍या ऑनलाइन व ऑफलाइन रिटेल स्‍टोअर्समध्‍ये दोन हजार रुपये टोकन रक्‍कम भरत फ्लॅगशिप गॅलॅक्‍सी एस सीरिज प्री-रिझर्व्‍ह करू शकतात. प्री-रिझर्व्‍ह करणारे ग्राहक अर्ली ॲक्‍सेससाठी (Early Access) पात्र ठरतील आणि नवीन गॅलॅक्‍सी एस सीरिज डिवाईसेसच्‍या खरेदीवर जवळपास पाच हजार रुपयांचे फायदेदेखील मिळवू शकतील.

लिंक: https://www.samsung.com/in/unpacked/

नवीन सॅमसंग गॅलॅक्सी एस सीरिजचे सर्व मॉडेल अ‍ॅडव्हान्स आणि नेक्स्ट जेनरेशन आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येतील. आयच्‍या मदतीने ग्राहकांना दररोज व्‍यक्‍तींबरोबर होणाऱ्या संवादाच्‍या पद्धतीमध्‍ये बदल घडून येईल. दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंग जानेवारी महिन्याच्या शेवटी होणाऱ्या गॅलॅक्सी अनपॅक इव्हेंटमध्ये (Galaxy Unpacked event) सॅमसंग गॅलॅक्सी एस सीरिजमध्ये गॅलॅक्सी एस २५, गॅलॅक्सी एस २५ प्लस व गॅलॅक्सी एस २५ अल्ट्रा यांचा समावेश असणार आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy s series arriving on january 22 how to pre reserve the s25 series here are the link asp