अगदी काही दिवसांवरच सॅमसंगच्या एस२४ [Samsung Galaxy S24] सीरिजचे लॉन्चिंग येऊन ठेपले आहे. असे असताना सॅमसंगच्या मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या सॅमसंग गॅलॅक्सी एस२३ व एस२३ प्लस या दोन फोनवर सध्या १० हजार उपायांची घसघशीत सवलत मिळत आहे. मात्र, नवीन फोन लॉन्च होण्याची वाट बघावी की या भन्नाट ऑफरचा फायदा करून घ्यायचा? त्यासाठी सध्या सॅमसंग स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्स आणि सवलतींबद्दल माहिती घेऊ. त्याचबरोबर कोणत्या स्मार्टफोनवर कुठे ऑफर मिळत आहे हेसुद्धा जाणून घ्या.

Samsung Galaxy S23, S23+, Ultra

सॅमसंग गॅलॅक्सी एस२३ : १२८GB स्टोरेज असणारा हा स्मार्टफोन सध्या फ्लिपकार्टवर ६४,९९९ रुपये या सवलतीच्या किमतीमध्ये मिळत आहे.
तसेच याचा २५६GB व्हेरियंट ६९,९९९ रुपयांच्या सवलतीच्या दरात मिळणार आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती

सॅमसंग गॅलॅक्सी एस२३ प्लस : ५६GB स्टोरेज कॉन्फिगरेशन स्मार्टफोनची मूळ किंमत ही ९४,९९९ रुपये इतकी आहे. मात्र, सध्या हा फोन ८४,९९९ रुपयांना मिळणार आहे. तर याचा ५१२ 2GB व्हेरियंट सवलतीच्या दरात ९४,९९९ रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून मिळते.

हेही वाचा : Big Bachat Dhamaal Sale: ‘आयफोन ’पासून ते ‘सॅमसंग’ पर्यंत फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळणार ‘या’ स्मार्टफोन्सवर भरघोस सवलत

सॅमसंग गॅलॅक्सीचा एस२३ अल्ट्रा या स्मार्टफोनवर अॅमेझॉनने भरघोस सवलत दिली आहे. त्यामुळे सध्या सॅमसंग गॅलॅक्सी एस२३ अल्ट्रा ९७,२४९ या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. मागच्या वर्षी जेव्हा हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला होता तेव्हा त्याची मूळ किंमत ही एक लाख २४ हजार ९९९ इतकी होती. त्यानुसार ग्राहकांना या स्मार्टफोनवर तब्बल २७,७५० रुपयांची सवलत मिळत आहे. त्यासह एचडीएफसी बँकेचे कार्ड वापरल्यास १० टक्के अतिरिक्त सवलत मिळू शकते.

एवढ्या जबरदस्त ऑफर्स सुरू असताना सॅमसंगच्या नव्या स्मार्टफोन सीरिज लॉन्चची वाट बघावी का?
खरे तर प्रत्येकाच्या आवडी आणि गरजांनुसार हा निर्णय सर्वस्वी ग्राहकांनी घेणे गरजेचे आहे. ज्याग्राहकां ना लवकरात लवकर उत्तम फीचर्स, कॅमेरा असणारा फोन घ्यायचा असेल, ते मागच्या वर्षीचे मॉडेल्स घेऊ शकतात. परंतु, यामध्येही स्टॅण्डर्ड मॉडेल घ्यावे की प्लस व्हर्जन घ्यावे, हा प्रश्न उभा आहे.

सॅमसंग गॅलॅक्सी S23, S23+ कोणता फोन घ्यावा?

सॅमसंग गॅलॅक्सी एस २३ प्लस या फोनमध्ये वेगाने चार्ज होणारी मोठी बॅटरी दिली आहे आणि याची स्क्रीनसुद्धा एस२३ पेक्षा मोठी आहे. त्यामुळे हे मॉडेल घेण्यास हरकत नाही. फोनमध्ये कॅमेऱ्यासोबतच बॅटरी आणि स्क्रीन उत्तम क्वालिटीची असणे गरजेचे असते. तुमच्या फोनचा वापर जास्त असल्यास, त्याची बॅटरी अधिक काळ टिकून राहणे गरजेचे असते. तसेच स्क्रीनवर एखादी गोष्ट बघताना, गेम खेळताना त्याचा अनुभव आपल्याला आनंद देणारा असायला हवा. त्यामुळे या दोन्ही बाबतीत सॅमसंग गॅलॅक्सी एस२३ प्लस हा स्मार्टफोन सॅमसंग गॅलक्सी एसपेक्षा उजवा ठरतो, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून मिळते.

हेही वाचा : ३५ हजार रुपयांच्या आत मिळणाऱ्या उत्तम ५G स्मार्टफोन्सची यादी पाहा; काय आहेत फिचर्स, जाणून घ्या….

मात्र, तुम्हाला अगदी अपडेटेड, नवीन व उत्तमोत्तम फीचर्स असणारे स्मार्टफोन वापरण्याची आवड असल्यास, तुम्ही नक्कीच सॅमसंग गॅलॅक्सी एस२४ सीरिजची वाट बघायला हरकत नाही. या स्मार्टफोन सीरिजचे लॉन्चिंग पुढच्या आठवड्यात होणार आहे.

Story img Loader