गेल्या काही दिवसात एका पाठोपाठ एक धडाधड स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहेत. आता दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगनेही कंबर कसली असून सॅमसंग लवकरच जबरदस्त स्मार्टफोन मालिका लाँच करणार आहे. ‘Samsung Galaxy S23’ ही मालिका बाजारपेठेत दाखल होणार आहे. या मालिकेमध्ये Galaxy S23, S23 Plus आणि S23 Ultra स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. या स्मार्टफोनचे डिझाइनही समोर आले आहे. दक्षिण कोरियाची कंपनी जानेवारी ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान या हँडसेटचे अनावरण करू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Samsung Galaxy S23 मालिकेची वैशिष्ट्ये

Samsung Galaxy S23 मध्ये जाड बेझलसह ६.१-इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल. हे १४६.३ x ७०.८ x ७.६ मिमी मोजले जाते, जे त्याच्या पूर्ववर्ती Galaxy S22 सारखे आहे. Galaxy S23 लाइनअप जागतिक स्तरावर Qualcomm Snapdragon 8 Gen 2 वर चालण्याची अपेक्षा आहे.Galaxy S23 Plus मध्ये ४७००mAh बॅटरी असू शकते. Galaxy S23 लाइनअपमध्ये काही मर्यादित रंग पर्याय आहेत. चार रंगांच्या प्रकारांमध्ये बेज, काळा, हिरवा आणि हलका गुलाबी रंगाचा समावेश आहे.

आणखी वाचा : विवो लवकरच लॉंच करणार नवा स्मार्टफोन; कॅमेरा तपशील लीक, जाणून घ्या काय असेल खास

Samsung Galaxy S23 Ultra मध्ये २०० एमपी कॅमेरा असेल

रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy S23 Ultra मध्ये २००-मेगापिक्सलचा Samsung HM1 ISOCELL सेंसर असेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जनरल १ सारखे प्रोसेसर २०० एमपी पर्यंत कमाल सिंगल-कॅमेरा रिझोल्यूशनला सपोर्ट देतात.

Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus या लाइनअपमधील दोन इतर मॉडेल्समध्ये १०८ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर असण्याची अपेक्षा आहे. तिन्ही मॉडेल्स बॅक पॅनलवर मल्टिपल कॅमेरा सेन्सर्ससह येतील. गॅलेक्सी एस२३ अल्ट्रा हा सीरिजमध्ये या सेंसरसह येणारा एकमेव हँडसेट असेल.