सॅमसंग एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करत असते. तर आता सॅमसंग कंपनी त्यांची नवीन सीरिज जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच १७ जानेवारी रोजी भारतात लॉन्च करणार आहे. यामध्ये तीन फोन लॉन्च केले जातील, ज्यात गॅलेक्सी एस२४ (Galaxy S24), एस२४ प्लस (S24 Plus) आणि एस२४ अल्ट्रा (S24 Ultra) आदींचा समावेश आहे. तसेच लॉन्च आधी हा स्मार्टफोन आता तुम्ही प्री-बुकिंगसुद्धा करू शकणार आहात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सॅमसंगचा स्मार्टफोन गॅलेक्सी एआय ‘Galaxy AI’ फिचरसह परिपूर्ण असेल. तर सॅमसंग कंपनीने भारतात आधीच गॅलेस्की एस२४ (Galaxy S24) सीरिजसाठी प्री-ऑर्डर बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट ‘samsung.com/in/unpacked/ ‘ वर भेट देऊ शकतात आणि नेक्स्ट गॅलेक्सी VIPPASS फक्त १,९९९ रुपयांमध्ये खरेदी करून नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन प्री-बुक करू शकतात. प्री-बुकिंगमुळे, ग्राहकांना नवीन Samsung Galaxy S24 सगळ्यांच्या आधी खरेदी करण्याची संधी तर असेलच, पण त्यांना ५,००० रुपये किमतीचे अतिरिक्त फायदे, एक्स्चेंज व्हॅल्यू , सुद्धा देईल. तसेच स्टोरेज अपग्रेड, गॅलेक्सी वॉच ४, गॅलेक्सी बड्स आदी गोष्टी तुम्हाला मिळू शकतात.

हेही वाचा…नवीन वर्षात iPhone 15 झाला स्वस्त! फ्लिपकार्टवर ‘इतक्या’ रुपयांची मिळणार सूट…

सॅमसंग गॅलेक्सी एस२४ स्पेसिफिकेशन :

सॅमसंग गॅलेक्सी एस२४ सीरिज विविध प्रकारच्या डिस्प्ले ऑफर करेल. स्टँडर्ड सॅमसंग गॅलेक्सी एस२४ मध्ये ६.२ इंच स्क्रीन असण्याची अपेक्षा आहे, तर एस२४ प्लस (S24+)मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच एस २४ अल्ट्रा, ६.८ इंचाच्या मोठ्या स्क्रीनसह येईल. सॅमसंग कंपनीनुसार या स्मार्टफोन्समध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ किंवा २४०० चिपसेट ऑफर करतील. भारतीय वापरकर्त्यांसाठी, Galaxy S24 मालिकेत Exynos चिपसेट असेल.

कॅमेरा :

एस २४ प्लस मॉडेलमध्ये दोन ५० मेगापिक्सेल कॅमेरा आणि 8K व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सक्षम असतील. तसेच एस२४ अल्ट्रामध्ये २०० मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा आणि अतिरिक्त झूमिंग क्षमतांसाठी डिझाइन केलेल्या लेन्ससह उपलब्ध असेल.

बॅटरी :

गॅलेक्सी एस २४ मध्ये ४,००० एएच बॅटरी, एस२४ प्लसमध्ये ४,९०० एमएचची मोठी बॅटरी आणि आणि एस२४ अल्ट्रा ५,००० एमएएचची सर्वात लक्षणीय बॅटरी असेल.