ऑक्टोबर महिन्याच्या ८ तारखेपासून फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू झाला आहे. ज्यांच्याकडे फ्लिपकार्ट प्लसचे सबस्क्रिप्शन आहे त्यांच्यासाठी हा सेल ७ तारखेपासूनच सुरू झाला आहे. या सेलमध्ये खरेदीदारांना अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर, स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि अन्य प्रॉडक्ट्सवर आकर्षक डिस्काउंट ऑफर्स मिळत आहे. या सेलमध्ये तसेच आयफोन १४ आणि आयफोन १३ हे सर्वाधिक लोकप्रिय स्मार्टफोन्सपैकी एक आहे. या सेल दरम्यान सॅमसंग गॅलॅक्सी Z फ्लिप ३ स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात किमी किंमतीत उपलब्ब्ध आहे. सॅमसंग गॅलॅक्सी Z Flip 3 स्मार्टफोन खरेदीदारांना फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये केवळ ११,६९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
सॅमसंग गॅलॅक्सी Z Flip 3: फीचर्स
सॅमसंग गॅलॅक्सी Z Flip 3 मध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले मिळतो. तसेच हूड अंतर्गत Qualcomm स्नॅपड्रॅगन ८८८ ऑक्टो कोअर चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. ज्यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरायला मिळते. या फोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास झेड फ्लिप ३ मध्ये ड्युअल १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी यामध्ये १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये वापरकर्त्यांना ३३०० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
हेही वाचा : Flipkart Big Billion Days 2023: २५ हजारांच्या आत फोन खरेदी करायचा आहे? वनप्लस, रेडमीसह ‘हे’ आहेत बेस्ट मॉडेल्स
सॅमसंग गॅलॅक्सी Z Flip 3 सर्वात स्वस्त असा फोल्डेबल स्मार्टफोन आहे. ज्याला तुम्ही फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ११,६९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. गॅलॅक्सी Z Flip 3 आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय फोल्डेबल स्मार्टफोन आहे. जो काही वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आला होता. तिसऱ्या जनरेशनचा गॅलॅक्सी Z Flip स्मार्टफोन अनेक चांगल्या फीचर्ससह येतो. हा स्मार्टफोन सुरुवातीला ८४,९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. मात्र सध्या फ्लिपकार्ट सेलमध्ये फोल्डेबल फोन केवळ ११,६९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलॅक्सी Z Flip 3 हा स्मार्टफोन ३८,३०० रुपयांच्या सूटसह केवळ ११,६९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. गॅलॅक्सी Z Flip 3 लॉन्च झालेल्या किंमतीवर ३५ हजारांच्या डिस्काउंटनंतर सध्या ४९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय खरेदीदारांना ICICI आणि Axix आणि City बँकेच्या क्रेडिट कार्डवर १ हजारांची सूट मिळू शकते. त्यामुळे या फोनची किंमत कमी होऊन ४८,९९९ रुपये इतकी होते. या शिवाय तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास फ्लिपकार्ट तुम्हाला ३७,३०० रुपयांचा डिस्काउंट देऊ शकतो. म्हणजेच सर्व बँक ऑफर्स आणि डिस्काउंटनंतर सॅमसंग गॅलॅक्सी Z Flip 3 हा फोन ३८,३०० रुपयांच्या डिस्काउंटनंतर ११,६९९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.