आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करत असतो. आपली बरीचशी कामे ही स्मार्टफोनच्या मदतीनेच पूर्ण होत असतात. २०२३ या वर्षांमध्ये आतापर्यंत अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी आपले स्मार्टफोन्स बाजारामध्ये लॉन्च केले आहेत. तसेच यापुढेही वापरकर्त्यांना आकर्षित करणारे काही स्मार्टफोन्स कंपन्या लॉन्च करणार आहेत. आगामी काळामध्ये कोणकोणते स्मार्टफोन्स लॉन्च होणार आहेत हे जाणून घेऊयात.

सॅमसंग Galaxy Z Fold 5

सॅमसंग कंपनीने फोल्डेबल स्मार्टफोनच्या जगामध्ये आपले नाव कमावले आहे. सॅमसंग जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या त्याच्या Unpacked इव्हेंटमध्ये Galaxy Z Fold 5 हा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोल्डेबल फोन गॅलॅक्सी झेड फोल्ड ४ चे एक अपडेट असणार आहे. Galaxy Z Fold च्या पुढील व्हर्जनमध्ये डिझाईनमध्ये काही बदल असणे अपेक्षित आहेत. त्यामुळे डिव्हाइसची जाडी कमी होऊ शकते. तसेच OLED स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC आणि अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असे फिचर असण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Worlds Most Powerful Passports 2025
Worlds Most Powerful Passports 2025 : जगात सिंगापूरचा पासपोर्ट पुन्हा सगळ्यात पॉवरफुल, भारताचा क्रमांक घसरला; तळाशी कोण? जाणून घ्या
Samsung Galaxy S25 Series Launch In India
Samsung Galaxy S25 : सॅमसंगचा पॉवरफूल स्मार्टफोन होणार ‘या’ तारखेला लाँच! कशी करायची प्री-बुकिंग? जाणून घ्या…

हेही वाचा : Realme चा ‘हा’ स्मार्टफोन आता Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध; किंमत, ऑफर एकदा बघाच

सॅमसंग Galaxy Z Flip 5

Galaxy Z Flip 5 हा सॅमसंग कंपनीचा क्लॅमशेल स्टाईलमधला फोल्डेबल फोन असेल. Galaxy Z Flip 5 मध्ये मोठा कव्हर डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. तसेच बाकी फीचर्स आणि इतर गोष्टी Galaxy Z Flip प्रमाणेच राहू शकतात. फोल्ड ५ या फोल्डेबल फोनप्रमाणेच फ्लिप ५ देखील स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC वर आधारित असू शकतो. तसेच वापरकर्त्यांना यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. कॉम्पॅक्ट डिझाईन आणि कमी किंमतीमुळे फ्लिप स्टाईलमधील फोल्डेबल फोन ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.

Nothing Phone (2)

नथिंग फोन (2) Qualcomm Snapdragon 8+ Gen1 SoC द्वारे समर्थित असेल. नथिंग फोन (१) प्रमाणेच आगामी स्मार्टफोनला तीन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. Nothing Phone (2) मध्ये मागील फोनपेक्षा ०.१५ इंच इतका मोठा डिस्प्ले देण्यात येणार आहे. म्हणजेच या नवीन फोनचा डिस्प्ले ६.७ इंच इतका असू शकतो. ज्यामध्ये AMOLED पॅनल आणि FHD+ रिझोल्यूशन ऑफर केले जाऊ शकते. हा फोन ११ जुलै रोजी लॉन्च होणार आहे.

हेही वाचा : VIDEO: Nothing कंपनीचा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन ११ जुलैला भारतात होणार लॉन्च, किंमत आणि फीचर्स एकदा पहाच

मोटोरोला Razr 40 series

भारतामध्ये लवकरच Razr 40 आणि Razr 40 Ultra लॉन्च करण्याची पुष्टी मोटोरोला कंपनीने केली आहे. हे डिव्हाईस केवळ Amazon वर उपलब्ध असणार आहेत. मोटोरोलाचे चे दोन्ही फोल्डेबल फोन एका नवीन डिझाईनसह सादर होऊ शकतात. Razr 40 Ultra या फोनला जगातील सर्वात पातळ(Slim) फ्लिप फोन असल्याचेच म्हटले जात आहे.

iQOO Neo 7 Pro

iQOO कंपनीचा Neo 7 Pro हा स्मार्टफोन ४ जुलै रोजी लॉन्च होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा एक ड्युअल चिप असणारा फोन आहे. ज्यामध्ये Snapdragon 8+ Gen 1 SoC आणि एक सेपरेट गेमिंग चिप आहे. स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना इंडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. फोनमध्ये केशरी रंगाचा फॉक्स लेदर बॅक पॅनल असेल. हा स्मार्टफोन भारतातील सर्वात परवडणारा Snapdragon 8+ Gen 1 SoC वर आधारित फोनपैकी एक असण्याचा अंदाज आहे.

Story img Loader