Samsung Galaxy Z Flip3 : फ्लिपकार्टवर दिवाळी सेल सुरू झाला आहे आणि सॅमसंग फोनच्या चाहत्यांसाठी हा सेल आनंदाची बातमी घेऊन आला आहे. स्टाईलिश, जबरदस्त फीचर, विशेष म्हणजे फोल्ड होणाऱ्या सॅमसंग गॅलक्सी झेड फ्लिप ३ या फोनवर ३६ हजार रुपयांची मोठी सूट मिळत आहे.

फोनची लिस्टेड प्राइज ९५ हजार ९९९ रुपये आहे. या फोनच्या किंमतीवर ३७ टक्क्यांची सूट देण्यात आल्याने किंमत ५९ हजार ९९९ रुपये झाली आहे. त्यामुळे, हा फोन स्वस्तात घेऊ इच्छिणाऱ्या सॅमसंगच्या चाहत्यांना सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. केवळ इतकेच नव्हे तर फोनवर अनेक बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे, तुम्हाला किंमत आणखी कमी करता येइल.

Gold and silver prices hike
Gold & Silver Prices Surge : चांदी लाखमोलाची; सोन्याची आगेकूच सुरूच
Samson's disclosure about Rohit Sharma
Sanju Samson : मी फायनल खेळणार होतो पण…
cyber thieves, people cheated, cyber crime,
सायबर चोरट्यांकडून तीन कोटींहून अधिक रकमेचा गंडा, नऊ जणांची फसवणूक
Viral video Elderly Couple In Karnataka Is Serving Unlimited Meals
५० रुपयांत पोटभर जेवण देणारे आजी-आजोबा; थरथरत्या हाताने ग्राहकांना वाढतात जेवण, पाहा प्रेमळ VIRAL VIDEO
man loses rs 90 Lakh after falling for lure of huge returns on share market investment
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ९० लाखांची फसवणूक
Navi Mumbai, cash stolen in five minutes,
नवी मुंबई : पाच मिनटांत अडीच लाखांची रोकड चोरी, पावती घेणे पडले महागात 
Flipkart Big Billion Days sale Top 5 motorcycles under Rs 2 lakh see list her
Flipkart Big Billion Days sale: २ लाख रुपयांच्या आत खरेदी करू शकता अशा टॉप ५ मोटारसायकल, येथे पाहा यादी
Yamaha offering festive discounts for customers
Yamaha च्या मोटारसायकल, स्कूटरवर हजारो रुपयांची सूट; ‘या’ दोन मॉडेल्सवर होईल मोठी बचत; वाचा काय आहे ऑफर

(स्मार्टफोन घ्यायचा आहे? बेस्ट डिल्स, सूटबाबत ‘या’ एकाच संकेतस्थळावर मिळेल सर्व माहिती)

फोनवर मिळत आहे ही बँक ऑफर

एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे ट्रान्झॅक्शन केल्यास १ हजार २५० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर एसबीआय क्रेडिट कार्ड इएमआय ट्रान्झॅक्शनवर २ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे.

एक्सचेंज ऑफर

एक्सचेंज ऑफरमध्ये सॅमसंग गॅलक्सी झेड फ्लिप ३ वर २८ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. हा फोन सध्या ५९ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. एक्सचेंज ऑफरने फोनची किंमत ३१ हजार ४९९ रुपये इतकी होते. म्हणजे ९५ हजार रुपयांचा हा ५ जी फोन केवळ ३१ हजारात मिळू शकतो.

(नेटफ्लिक्सकडून युजर्सना मोठा धक्का! आता पासवर्ड शेअरींगसाठी द्यावे लागतील अतिरिक्त पैसे)

काय आहे फीचर?

हा फोन ५ जी असून तो फ्लिप होतो. म्हणजेच फोन मध्यभागी मोडून बंद करता येतो. हे या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये आहे. याने कमी जागेत सुद्धा हा फोन ठेवता येतो. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम देण्यात आली आहे. फोनमध्ये ६.७ इंच फूल एचडी डिसप्ले देण्यात आला आहे. सुंदर फोटो निघण्यासाठी फोनच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आणि सेल्फीसाठी पुढे १० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

दीर्घकाळ कार्य करता यावे यासाठी फोनमध्ये ३ हजार ३०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये गतिमान कार्यासाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आले आहे. फ्लिप फीचरमुळे हा फोन छोट्या पॉकेटमध्येही आरामात राहू शकतो.