Samsung ही एक टेक कंपनी आहे. कंपनी अनेक प्रॉडक्ट्स आपल्या ग्राहकांसाठी लॉन्च करत असते. सॅमसंग कंपनी एक दक्षिण कोरियन कंपनी आहे. सॅमसंगचा एक इव्हेंट होणार आहे त्याबद्दल कंपनीने काही माहिती दिली आहे. सॅमसंगचा ‘Unpacked’ इव्हेंट २६ जुलै रोजी होणार आहे. हा इव्हेंट दक्षिण कोरिया येथे आयोजित केला जाणार आहे. सॅमसंग कंपनी कोणत्याही लॉन्चिंग आधी त्या प्रॉडक्टविषयी खुलासा करण्यासाठी ओळखली जाते. तसेच आपले प्रतिस्पर्धी Apple प्रमाणे गोष्टी लपवू शकत नाही.
सॅमसंगच्या unpacked इव्हेंटमध्ये सॅमसंग Galaxy Z Fold 5 आणि सॅमसंग Galaxy Z Flip 5 चे फीचर्स आणि फोटो लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाल्या आहेत. तसेच नवीन जनरल सॅमसंग फोल्डेबल फोन्सच्या अगदी जवळ येत असताना, एका टिपस्टरने या फोन्सच्या किंमत उघड केली आहे. टिप्सटर Paras Guglani यांनी या दोन्ही फोन्सच्या भारतातील किंमती उघड केल्या आहेत. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
हेही वाचा : Income Tax: Phone Pe च्या मदतीने भरता येणार इन्कम टॅक्स, लॉन्च केले ‘हे’ फिचर
टीपस्टर पारस गुगलानी यांच्या ट्विटनुसार Samsung Galaxy Z Flip 5 ची सुरुवातीची किंमत ९५,००० रुपये असू शकते. तर दुसरीकडे Samsung Galaxy Z Fold 5 ची सुरुवातीची किंमत १,४३,५०० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. लहान Galaxy Flip 5 मध्ये १२८ जीबी बेस स्टोरेज असू शकते. तर Galaxy Fold 5 मध्ये २५६ जीबी स्टोरेज असू शकते.
Samsung Galaxy Z Fold 5 : स्पेसिफिकेशन्स (अफवा)
Samsung Galaxy Z Fold 5 मध्ये वापरकर्त्यांना ६.२ इंचाचा कव्हर डिस्प्ले आणि ७.६ इंचाचा डायनॅमिक AMOLED प्रायमरी डिस्प्ले मिळेल अशी अपेक्षा आहे. दोन्ही डिस्प्लेमध्ये १२० Hz रिफ्रेश रेट असल्याचे सांगितले जात आहे. हूड अंतर्गत फ्लॅगशिप फोल्डबेल स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC द्वारे १२ जीबी रॅम आणि १ टीबी पर्यंत स्टोरेज असू शकते.
Samsung Galaxy Z Flip 5: स्पेसिफिकेशन्स (अफवा)
Samsung Galaxy Z Flip 5 मध्ये कदाचित ३. ४ इंचाचा कव्हर डिस्प्ले आणि १२० Hz रिफ्रेश रेट असलेला ६.७ इंचाचा डायनॅमिक AMOLED प्रायमरी डिस्प्ले मिळू शकतो. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेटसह ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळू शकते. यामध्ये ३,७०० mAh क्षमतेची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.