Samsung Galaxy Unpacked: बुधवारी म्हणजे २६ जुलै रोजी सॅमसंगचा Unpacked इव्हेंट पार पडला. त्यामध्ये कंपनीने आपली अनेक नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केली आहेत. त्यात सॅमसंगने नवीन गॅलॅक्सी फोल्डिंग स्मार्टफोन,टॅबलेट आणि स्मार्टवॉचच्या भारत-विशिष्ट किंमती जाहीर केल्या आहेत. कंपनीने Galaxy Z Fold, Galaxy Z Flip 5, Galaxy Tab S9 सिरीज आणि Galaxy Watch 6 सिरीज लॉन्च केली. या वर्षी सॅमसंगने आपले अधिकाधिक प्रॉडक्ट्सच्या किंमत सारख्याच ठेवल्या आहेत. कारण कंपनीला Xiaomi आणि Oppo सारख्या Android प्रतिस्पर्ध्यांकडून प्रीमियम सेगमेंटमध्ये कठोर स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. र्व नवीन सॅमसंग प्रॉडक्ट्स आज प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सॅमसंग Galaxy Z Fold 5 आणि गॅलॅक्सी Z Flip 5 : भारतातील किंमत

नवीन सॅमसंग फोल्डिंग फोनमध्ये आता स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC आणि नवीन hinge डिझाइनचा समावेश आहे. सॅमसंगने Galaxy Z Flip 5 च्या डिस्प्लेमध्ये काही सुधारणा देखील केल्या आहेत. Samsung Galaxy Z Flip 5 हा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९९,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत १,०९,९९९ रुपये आहे.तसेच कंपनीने सॅमसंग Galaxy Z Fold 5 हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. यातील १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत १,५४,९९९ रुपये आहे.तर १२/५१२ व्हेरिएंटची किंमत १,५४,९९९ रुपये आहे. तसेच यातील १२ जीबी रॅम आणि १ टीबी व्हेरिएंटची किंमत १,८४,९९९ रुपये आहे.

प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना २३,००० रुपये (Z Flip 5 साठी २०,००० रुपये) र्यंतचे फायदे मिळतील असे सॅमसंगचे म्हणणे आहे. फायद्यांमध्ये कॅशबॅक आणि अपग्रेड बोनसचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : एलॉन मस्कने पुन्हा अपडेट केला नवा ‘X’ लोगो; लगेच मागे घेतला निर्णय, जाणून घ्या कारण

सॅमसंग Galaxy Watch 6 सिरीज : भारतातील किंमत

सॅमसंग स्मार्टवॉच हे नवीन आरोग्य फीचर्ससह आणि फॉल डिटेक्शनसह येतात. यात अधिक Apps चे समर्थ देखील मिळते. गॅलॅक्सी वॉच ६ सह AFib किंवा अनियमित हृदय गतीचे निरीक्षण करू शकतात असे कंपनीचे म्हणणे आहे. वॉच 6 आणि वॉच 6 क्लासिक या दोन सिरीज जुन्या सॅमसंग स्मार्टवॉच प्रमाणेच आहेत. फीचर्स कमी जास्त असली तरी देखील दोन्ही अगदी वेगळी दिसतात.

सॅमसंग गॅलॅक्सी वॉच 6 40 mm ब्लूटूथ : २९,९९९ रुपये
सॅमसंग गॅलॅक्सी वॉच 6 40 mm LTE: ३३,९९९ रुपये
सॅमसंग गॅलॅक्सी वॉच 6 44 mm ब्लूटूथ :३२,९९९ रुपये
सॅमसंग गॅलॅक्सी वॉच 6 44 mm LTE: ३६,९९९ रुपये
सॅमसंग गॅलॅक्सी वॉच 6 क्लासिक 43mm ब्लूटूथ : ३६,९९९ रुपये
सॅमसंग गॅलॅक्सी वॉच 6 क्लासिक 43mm LTE: ४०,९९९ रुपये
सॅमसंग गॅलॅक्सी वॉच 6 क्लासिक 47mm ब्लूटूथ : ३९,९९९ रुपये
सॅमसंग गॅलॅक्सी वॉच 6 क्लासिक 43mm LTE: ४३,९९९ रुपये

सॅमसंग काही निवडक बँकांसह ६ हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर देत आहे. तसेच ४ हजार रुपयांचा अपग्रेड बोनस देत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy z fold z flip watch 6 series and s9 galaxy watch launch unpacked event 2023 check price tmb 01