स्मार्टफोन युजर्समध्ये Samsung कंपनी चांगलीच लोकप्रिय आहे. तुम्हीही Samsungचे फॅन असाल आणि कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, सध्या Samsungच्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही डीलबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सॅमसंग स्मार्टफोनवर ९० हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळेल. या स्मार्टफोनचे नाव ‘Samsung Galaxy Z Fold3 5G’ आहे, ज्यावर बंपर डिस्काउंट दिला जात आहे.

हा फोन आकर्षक डिझाइनसह येतो. ज्यांना इतरांपेक्षा वेगळा स्मार्टफोन हवा असेल ते हा फोन नक्कीच खरेदी करू शकतात. Samsung Galaxy Z Fold3 5G चा हा स्मार्टफोन १२GB रॅम आणि २५६GB स्टोरेज दिला जात आहे. या फोनची मूळ किंमत १,७१,९९९ रुपये आहे, जी 42 टक्के सूट देऊन ९९,९९९ रुपयांना विकली जात आहे. यासोबतच त्यावर अतिरिक्त सवलतही दिली जात असून, अर्ज केल्यानंतर तुम्हाला ९० हजारांहून अधिक सूट मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही हा फोन बंपर डिस्काउंटमध्ये कसा खरेदी करू शकता.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण

(हे ही वाचा : स्मार्टफोन, विंडोज, नव्हे तर ‘Microsoft’ पैसा कमवतो कुठून? ‘हे’ आहे बक्कळ कमाईचे रहस्य )

अशा प्रकारे तुम्हाला 90 हजार रुपयांची सूट मिळेल

सॅमसंगचा Galaxy Z Fold3 5G स्मार्टफोन ४२ टक्के डिस्काउंटवर विकला जात आहे, त्यामुळे जर तुम्ही ते जोडले तर त्यावर एकूण ७२,२३९.५८ रुपयांची सूट दिली जात आहे. यासोबतच यावर १८०५० रुपयांची एक्सचेंज डिस्काउंटही देण्यात येत आहे. या प्रकरणात, तुम्ही एकूण ९०,२८९.५८ रुपयांच्या सवलतीचा लाभ घेऊ शकता. यासह, तुम्हाला HSBC क्रेडिट कार्डने फोन खरेदीवर ५ टक्के (जास्तीत जास्त २५० रुपये) सूट मिळू शकते. याशिवाय तुम्ही हा फोन EMI वर देखील खरेदी करू शकता.

Samsung Galaxy Z Fold 3 5G ची वैशिष्ट्ये

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ३ ५जी स्मार्टफोनमध्ये ७.६ इनफिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. मेन आणि कव्हर स्क्रीन दोन्हीवर सुपर स्मूथ १२० हर्ट्ज अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटसह स्मूथ स्क्रॉलिंग आणि क्विक डिव्हाइस इंटरॅक्शन अनुभव मिळेल. यूजर्सला मेन स्क्रीनवर व्हिडीओ कॉलिंग दरम्यान नोट्स लिहिणे, ईमेल वाचणे, टू-डू लिस्ट चेक करता येईल. यूजर पेनसह क्रिएटिव्हिटी आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतात.

(हे ही वाचा : ट्विटर युजर्संना मिळणार भन्नाट फीचर, आता दुसऱ्यांचे आवडलेले ट्विट करा तुमच्याकडे सेव्ह )

फोनसोबत एस पेन फोल्ड एडिशन आणि एस पेन प्रो अशा दोन पर्यायांसोबत येतो. पेनला वेगळे खरेदी करावे लागेल. फोनमधील मल्टी- अ‍ॅक्टिव्ह विंडोसह डिव्हाइसच्या मोठ्या स्क्रीनवर कॅलेंडर तपासू शकता व टेक्स्ट देखील करता येईल. झेड फोल्ड ३ वर यूजर अ‍ॅप्स उघडण्यासाठी एक शॉर्टकट देखील बनवू शकतात.