Samsung Galaxy S24 FE Pre booking Details : ग्राहक गॅलॅक्सी एस २४ एफई (Samsung Galaxy S24 FE) स्मार्टफोन अनेक दिवस चर्चेत राहिला. हा स्मार्टफोन ३ ऑक्टोबरपासून सर्वत्र उपलब्ध होईल. आता या स्मार्टफोनची प्री-बुकिंगसुद्धा सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो. तर या सॅमसंगच्या स्मार्टफोनचे फीचर्स, व्हेरिएंट, किंमत, कलर ऑप्शन्स काय असणार चला जाणून घेऊयात…

किंमत, व्हेरिएंट, कलर ऑप्शन्स :

सॅमसंगचा ८ जीबी रॅम + १२८ जीबी व्हेरिएंट किंमत ५९,९९९ रुपये आहे, तर ८ जीबी रॅम + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ६५,९९९ रुपये आहे. तसेच यामध्ये ब्ल्यू, ग्रेफाइट आणि मिंट आदी रंग पर्याय आहेत.

प्री-बुकिंग डिटेल्स :

ग्राहक सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर सॅमसंग गॅलॅक्सी एस २४ एफई प्री-बुक करू शकतात. सॅमसंगने सांगितले की, जे ग्राहक गॅलॅक्सी एस २४ एफईचे ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज वेरिएंट प्री-बुक करतात, ते हा स्मार्टफोन ५९,००० रुपयांपर्यंत खरेदी करू शकतात; ज्याची मूळ किंमत ६५,९९९ रुपये आहे. या व्यतिरिक्त ग्राहक ९९९ रुपयांच्या सवलतीच्या किमतीत सॅमसंग केअर प्लस पॅकेजचा लाभ घेऊ शकतात आणि १२ महिन्यांपर्यंतच्या विना-व्याज समान ईएमआय प्लॅनचे पर्यायदेखील निवडू शकतात.

हेही वाचा…Fab Grab Fest : स्मार्टफोन्सवर ५३ टक्के सूट; तर फ्रिजवर मायक्रोवेव्ह मोफत; वाचा सॅमसंगच्या सेलमध्ये आणखीन काय असणार ऑफर्स

सॅमसंग गॅलॅक्सी एस २४ एफई (Samsung Galaxy S24 FE) मध्ये एफएचडी प्लस रिझोल्यूशन आणि १२० एचझेड रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. फोटोसाठी, स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह ५० एमपी प्रायमरी कॅमेरा आहे, त्याचबरोबर १२ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा, ८ एमपी टेलिफोटो कॅमेरा आहे.

गॅलॅक्सी स्मार्टफोनवर (Samsung Galaxy ) AI अनुभवासाठी Exynos 2400e चिप वापरली जाते, जी Galaxy S24 फ्लॅगशिप स्मार्टफोनलाही पॉवर देते. गॅलॅक्सी स्मार्टफोनमध्ये काही AI-आधारित फीचर्स आहेत. जसे की, सर्कल टू सर्च, लाईव्ह ट्रान्सलेट, (फोन कॉलसाठी), वैयक्तिक संभाषणादरम्यान रिअल-टाइम ट्रान्सलेट, कंपोजर हे टूल तुम्हाला विचारांची मांडणी आणि लेखनात मदत, तर नोट असिस्ट तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी लिहून घेण्यास मदत करतील; तर फोटो एडिट करण्यासाठी जनरेटिव्ह एडिटिंग, पोट्रेट स्टुडिओ, इन्स्टंट स्लो-मो आदी पर्यायसुद्धा दिले जाणार आहेत.

फीचर्स :

डिस्प्ले – 6.7-इंच FHD+, डायनॅमिक AMOLED 2X, 120Hz रिफ्रेश रेट, व्हिजन बूस्टर तंत्रज्ञान
प्रोसेस – Exynos 2400e
रॅम – 8 जीबी
स्टोरेज – 128GB / 256GB / 512GB
बॅक कॅमेरा – ५० एमपी प्रायमरी (OIS सह) + 12MP अल्ट्रा-वाइड + 8MP टेलिफोटो
फ्रंट कॅमेरा – १० एमपी
बॅटरी – ४,७०० एमएएच
चार्जिंग – २५ डब्ल्यू वायर्ड, वायरलेस चार्जिंग सपोर्ट
प्रोटेक्शन – आयपी ६८ आदी बऱ्याच गोष्टी या फोनमध्ये देण्यात आल्या आहेत.