OnePlus Open Launch Event Today Live Streaming in Marathi: सॅमसंग कंपनीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सॅमसंगने भारतात गॅलॅक्सी A05s हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सॅमसंग ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. A सिरीज अंतर्गत हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये Qualcomm स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे ज्यात ६ जीबी रॅम देण्यात आली आहे. या फोनमध्ये कोणकोणते फीचर्स मिळणार आहेत, याचा कॅमेरा कसा आहे आणि याची किंमत किती आहे, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सॅमसंग Galaxy A05s : फीचर्स

सॅमसंग गॅलॅक्सी A05s या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट मिळणार असून, हा फोन अँड्रॉइड १३ आऊट ऑफ बॉक्स वर चालतो. सॅमसंगच्या या नवीन फोनमध्ये वन UI ५.१ इंचाचा इंटरफेस देण्यात आला आहे. तसेच वापरकर्त्यांना या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी PLS एलसीडी डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आली असून, यात ६जीबी रॅम जोडण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

हेही वाचा : OnePlus Open Video: आज लॉन्च होणार वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोन, कुठे पाहता येणार लाइव्ह इव्हेंट? जाणून घ्या

सॅमसंग गॅलॅक्सी A05s फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि २ मेगापिपिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी यामध्ये १३ मेगापिक्सल्चा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. या फोनमध्ये १२८ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटीसाठी ४ जी एलटीई, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ ५.१, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. तसेच यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. हॅण्डसेटमध्ये २५ W चा चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे.

सॅमसंग Galaxy A05s : किंमत

सॅमसंग गॅलॅक्सी A05s च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १७,४९९ रुपये इतकी आहे. मात्र कंपनीच्या वेबसाइटवर हा फोन १४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. गॅलॅक्सी A05s हा फोन तुम्ही काळ्या, हिरव्या आणि लाइट व्हॉयलेट या रंगांमध्ये खरेदी करू शकता. तसेच हा फोन एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डच्या ईएमआय व्यवहारांवर १ हजारांचा झटपट डिस्काउंट मिळू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung launch a05s in 5000 mah battery and 50 mp camera check price and all details tmb 01