सॅमसंग हा भारतातील सर्वांत मोठा इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड आहे. सॅमसंग या कंपनीची मोबाईल, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आदी अनेक उत्पादने मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर आज कंपनीने पहिली एआय इकोबबल टीएम (AI EcobubbleTM) स्वयंचलित (automatic) फ्रंट लोड नवीन वॉशिंग मशीन लाँच केली आहे. या वॉशिंग मशीनमध्ये एआय वॉश, क्यू-ड्राइव्ह टीएम, ऑटो डिस्पेन्स आदी प्रगत फीचर्सही उपलब्ध आहेत. तसेच ही वॉशिंग मशीन तुम्हाला कपडे ५० टक्के वेगात धुऊन देण्यास, ४५ टक्के फॅब्रिक केअरसाठी मदत, तर ७० टक्क्यांपर्यंत तुम्हाला विजेची बचतही करून देते.
काय आहे या वॉशिंग मशीनची खासियत?
सॅमसंगची वॉशिंग मशीन एआय इकोबबल टीएम तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे; ज्यामुळे क्यू-बबल टीएम तंत्रज्ञानामध्ये जलदपणे डिटर्जंट समाविष्ट करून घेण्याची अधिक क्षमता ठेवते. तसेच मशीनमध्ये अतिरिक्त वॉटर शॉट्ससह डायनॅमिक ड्रम रोटेशन समाविष्ट आहे. वॉशिंग मशीनमधील क्विक ड्राइव्ह टीएम कपडे धुण्याचा वेळ जवळपास ५० टक्क्यांनी कमी करतो. या वैशिष्ट्यांमुळे पाणी व विजेचीही मोठ्या प्रमाणात बचत होते. ऑटो डिस्पेन्स आणि एआय वॉश असलेली ही नवीन वॉशिंग मशीन सर्वोत्तम व स्मार्ट आहे. तसेच एआय वॉश वैशिष्ट्य कपड्यांचा भार ओळखते आणि त्यानुसार आवश्यकप्रमाणे पाणी व डिटर्जंटचा वापर करते. तसेच ही मशीन कपड्यांची मृदुता ओळखून कपड्यांच्या संरक्षणासाठी वॉश व स्पिनची वेळ समायोजित करते.
या वॉशिंग मशीनचा आकार ६०० x ८५० x ६०० मिमी आणि वजन ११ किलो आहे. त्यामुळे ही मशीन कोणत्याही जागेत सहजपणे सामावली जाऊ शकते. स्वाभाविकत: ग्राहकांसाठी ही वॉशिंग मशीन एक उत्तम पर्याय ठरेल. नवीन एआय इकोबबल टीएम (AI Ecobubble™) मॉडेल क्विक ड्राइव्ह टीएम (Quick DriveTM) तंत्रज्ञानाच्या मदतीने या मशीनमध्ये फक्त ३९ मिनिटांत स्वच्छ कपडे धुऊन मिळतात. तसेच वापरकर्त्यांना डिटर्जंट ड्रॉवरमधील चिकट अवशेष साफ करता यावा यासाठी ‘स्टे क्लीन ड्रॉवर’ आहे. या खास डिझाईन केलेल्या वॉटर फ्लशिंग सिस्टीममधून अधिकाधिक चिकट अवशेष साफ होण्यास मदत होईल.
हेही वाचा…ग्राहक दिनानिमित्त ओप्पो ग्राहकांसाठी सुरू करणार ‘ही’ सेवा; आता सर्व्हिस सेंटरला जाण्याची गरज नाही
नवीन एआय इकोबबल टीएम वॉशिंग मशीन वाय-फाय टेक्नॉलॉजीसह उपलब्ध झाली आहे; ज्यामुळे स्मार्ट थिंग्सच्या माध्यमातून कधीही व कुठेही वॉशिंग मशीनवर देखरेख ठेवण्याची सुविधा ग्राहकांना मिळते. पण, ही बाब लक्षात ठेवणेही महत्त्वाचे आहे की, ही ऑटो सायकल लिंक फक्त तेव्हाच उपलब्ध असते जेव्हा वॉशर आणि ड्रायर दोन्ही AI कंट्रोल आणि वाय-फाय या सुविधांद्वारे जोडलेले असतात.
पहिली एआय वॉशिंग मशीन लाँच केल्यानंतर सॅमसंग इंडियाच्या डिजिटल अप्लायन्सेस व्यवसायाचे वरिष्ठ संचालक पुष्प बाईशाकिया म्हणाले, “सॅमसंगने सर्वोत्तम व प्रगत तंत्रज्ञान सादर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही विविध ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजा लक्षात घेत, नवीन श्रेणी डिझाइन केली आहे.फुली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशीन अत्यंत कार्यक्षम आहे. ऑटो डिस्पेन्स, एआय वॉश व क्यू-ड्राइव्हTM यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे वापरकर्त्यांना वॉशिंग मशीन वापरण्यास अधिक सोपी होते, असे ते यावेळी म्हणाले आहेत.
वॉशिंग मशीनला कंट्रोल पॅनेलसह आधुनिक डिझाइन असेल आणि काळ्या रंगात ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. वॉशिंग मशीनची सुरुवातीची किंमत ६७,९९० पासून सुरु होऊन ७१,९९० रुपयांपर्यंत पर्यंत असेल. वॉशिंग मशीन सॅमसंग अधिकृत ऑनलाइन स्टोअर Samsung.com सॅमसंग शॉप ॲप, रिटेल स्टोअर्स आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. डिजिटल इन्व्हर्टर तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या या वॉशिंग मशीनला कंपनीने २० वर्षांची वॉरंटी दिली आहे. तसेच ग्राहकांसाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित सॅमसंगची नवीन वॉशिंग मशीन मार्केटमध्ये उपलब्ध झाली आहे.