Samsung कंपनीने भारतामध्ये Crystal 4K iSmart UHD TV सिरीज लॉन्च केली आहे. हे टीव्ही ऑनबोर्डिंगसह इंटीग्रेटेड IoT हब आणि ऑटोमॅटिक ब्राईटनेस अ‍ॅडजस्टसह IoT सेन्सर्स असलेले फीचर्स देतात. नुकतेच कंपनीने भारतामध्ये Neo QLED TV 2023 4K आणि 8Kहे मॉडेल्स लॉन्च केले होते. आता सॅमसंगने लॉन्च केलेल्या Crystal 4K iSmart UHD TV सिरीजमधील टीव्हीची किंमत फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Samsung Crystal 4K iSmart UHD TV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या टीव्ही सिरीजमधील टीव्हीच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ४३,५० आणि ५५ व ६५ इंचाचे 4K डिस्प्ले देण्यात आले आहेत. ज्याचे रिझोल्युशन ३८४० x २१६० इतके आहे. Samsung Crystal 4K iSmart UHD TV मध्ये स्लिम लूक आणि बेझल लेस डिझाईन दिले गेले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये ३ HDMI पोर्ट, एक डिजिटल ऑडिओ पोर्ट, यूएसबी पोर्ट आणि RF In आणि ब्लूटूथ v५.२ व वायफायचा सपोर्ट दिला आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
Lakhat Ek Aamcha dada
तेजूला लग्नासाठी पुन्हा नकार; भाग्यश्रीला मात्र दादाची काळजी; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नवे वळण
maharashtrachi hasya jatra show will start again from december prajakta mali shares video
Video : तारीख अन् वेळ ठरली! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा येणार…; प्राजक्ता माळीने शेअर केली सेटवरच्या शूटिंगची झलक
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…

हेही वाचा : Meta ची कर्मचारी कपातीची नवीन फेरी लवकरच सुरू होणार; यावेळी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

Samsung Crystal 4K iSmart UHD TV ची २०२३ सिरीज ही क्रिस्टल टेक्नॉलॉजीवर काम करते. यामध्ये ४३ इंचापासून ते ६५ इंच स्क्रीन असणाऱ्या टीव्हीचा समावेश आहे. या टीव्हींमध्ये वन बिलियन ट्रू कलर्स, चांगल्या व्हिज्युअल्ससाठी HDR १०+ आणि ३ बाजूंनी बेझल लेस डिझाईन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ऑडिओ सिस्टिमविषयी बोलायचे झाल्यास हे टीव्ही चांगली साउंड क्वालिटी देतात. ज्यासाठी Q-Symphony, OTS Lite, Adaptive साउंड टेक्नॉलॉजी डायनेमिक ऑडिओचे आउटपुट मिळते. Samsung Crystal 4K iSmart UHD TV वापरकर्त्यांना Samsung TV Plus चा अ‍ॅक्सेस मिळतो.

हेही वाचा : ऑनलाईन ऑर्डरमध्येही ‘हापूस’ने मारली बाजी, ‘या’ अ‍ॅपवर भारतीयांनी एप्रिलमध्ये मागवले तब्बल २५ कोटींचे आंबे

काय आहे Samsung Crystal 4K iSmart UHD TV ची किंमत ?

सॅमसंगच्या Crystal 4K iSmart UHD TV च्या ४३ इंची टीव्हीची किंमत ही ३३,३९० रुपये आहे. ५० इंची मॉडेलची किंमत ४५,९९९ रुपये आहे. तर ५५आणि ६५ इंची डिस्प्ले असणाऱ्या टीव्हीची किंमत अनुक्रमे ४७,९९० रुपये आणि ७१,९९० रुपये इतकी आहे. हे स्मार्ट टीव्ही ग्राहक स्लिक ब्लॅक या रागामध्ये खरेदी करू शकतात. Samsung Crystal 4K iSmart UHD TV विक्रीसाठी Amazon , Flipkart आणि सॅमसंग शॉपमध्ये उपलब्ध होणार आहेत. सॅमसंग निवडक बँकेच्या कार्डवर की वर्षापर्यंत नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील देत आहे.