Samsung ही एक लोकप्रिय आणि आघाडीची कंपनी आहे. सॅमसंगने आपल्या ग्राहकांसाठी भारतामध्ये Galaxy M34 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ६००० mAh क्षमतेची बॅटरी आणि १२० Hz इतका रिफ्रेश रेट मिळणार आहे. तसेच काही बँक ऑफर्स देखील यावर उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन विक्रीसाठी Amazon वर उपलब्ध असणार आहे.

सॅमसंग Galaxy M34 5G चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग Galaxy M34 5G वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिग्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. डिस्प्लेला गोरिला ग्लास ५ चे संरक्षण देण्यात आले आहे. हा फोन 5nm Exynos 1280 चिपसेटद्वारे समर्थित आहे . यामध्ये तुम्हाला वापरण्यासाठी ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळणार आहे. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यात साईड माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित One UI वर चालतो.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

हेही वाचा : स्पर्धा करा, फसवणूक नाही: ट्विटरची मेटाला कोर्टात खेचायची धमकी

सॅमसंगने लॉन्च केलेल्या नवीन स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये OIS सह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मॉन्स्टर शॉट २.० फीचरला सपोर्ट करतो. ज्यामुळे वापरकर्त्याला एका शॉटमध्ये ४ व्हिडीओ आणि ४ फोटो कॅप्चर करता येतात. सेल्फीसाठी यामध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग Galaxy M34 5G मध्ये ६००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. त्याला २५ W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. याला चार्जिंगसाठी टाईप-सी पोर्ट येतो. एकदा चार्ज केल्यावर या फोनची बॅटरी २ दिवस टिकू शकते असा कंपनीचा दावा आहे.

हेही वाचा : Twitter ला टक्कर देणाऱ्या मेटाच्या Threads अ‍ॅपची ‘ही’ आहेत १० जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या

सॅमसंग Galaxy M34 5G ची किंमत

सॅमसंग Galaxy M34 5G हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये भारतात लॉन्च करण्यात आला आहे. ६जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंत १८,९९९ रुपये आहे तर ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत २०,९९९ रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर खरेदीदारांना २ हजार रुपयांची बँक ऑफर मिळणार आहे. हा फोन खरेदीदारांना मिडनाईट ब्लू, प्रिझम सिल्व्हर आणि वॉटरफॉल ब्लू या तीन रंगांमध्ये खरेदी करता येईल.

हा स्मार्टफोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. Galaxy M34 5G ची विक्री Amazon, Samsung आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर १५ जुलैपासून सुरु होणार आहे. १५ आणि १६ जुलै रोजी Amazon चा प्राईम डे सेल होणार आहे.