Samsung एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करत असते. नुकताच कंपनीचा Unpacked इव्हेंट दक्षिण कोरियामध्ये पार पडला. यामध्ये कंपनीने अनेक फोल्डेबल फोन , वॉच सिरीज अशी अनेक प्रॉडक्ट्स लॉन्च केली आहेत. सॅमसंग २०२४ या वर्षामध्ये ‘Galaxy Ring’ नावाची आपली स्मार्ट रिंग लॉन्च करण्याची तयारी करत आहेत. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याआधी कंपनी आपले यश सुनिश्चित करण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटक उत्पादकांशी सहयोग करत आहे. ज्याचा निर्णय पुढील महिन्याच्या सुरुवातीला घेतला जाऊ शकतो.
२०२४ मध्ये कंपनी गॅलॅक्सी रिंग लॉन्च करणार आहे. या स्मार्ट रिंगमध्ये इन बिल्ट सेन्सर्स आहेत जे तपशीलवार शरीराचा आणि आरोग्याचा डेटा संकलित करतात. जे कनेक्टेड स्मार्टफोनवर अॅक्सेस केले जाऊ शकते. अचूकता सुधारण्यासाठी रिंग वापरकर्त्यांच्या बोटाच्या आकारामध्ये फिट करण्यासाठी अॅड्जस्ट केले जाऊ शकते. ज्यामुळे सैल फिटिंगमुळे संभावित डेटामधील त्रुटी कमी केल्या जाऊ शकते. याबाबतचे वृत्त indiatvnews ने दिले आहे.
तथापि, सॅमसंग कंपनीला डेव्हलपमेंट दरम्यान अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. जसे की कमी रक्तपुरवठ्याचा सामना करणे किंवा घट्ट फिटिंगमुळे डेटाच्या अचूकतेवर होणारा परिणाम. याशिवाय मोट्या उत्पादन करण्यासाठी मंजुरी मिळाल्यास मेडिकल डिव्हाइस स्टेट्स सर्टिफिकेशन मिळण्यासाठी १० ते १२ महिन्यांचा कालावधी लागू शकतात. त्यामुळे उत्पादन होण्यास वेळ लागू शकतो.
याशिवाय , पेटंट अॅप्लिकेशननुसार सॅमसंग ‘Galaxy Ring’ ला XR (मिक्स रिअॅलिटी ) डिव्हाइससह एकत्रित करण्याचा विचार करत आहे. जे कॅमेरा आणि सेन्सरचा उपयोग वापरकर्त्यांच्या डोक्याच्या आणि हातांच्या हालचाली ट्रॅक ठरण्यासाठी XR टेक्नॉलॉजीचा लाभ घेत आहे. एकूणच, ‘गॅलेक्सी रिंग’ सॅमसंगच्या वेअरेबल हेल्थ टेकमध्ये प्रवेश करू शकते. तथापि कंपनीलाउत्पादन यशस्वीरीत्या बाजारात आणण्यासाठी काही तांत्रिक अडथळ्यांवर मात करणे आणि प्रक्रियेत नेव्हीगेट करणे आवश्यक आहे.