सध्याच्या काळामध्ये लोकांचे राहणीमान हे सुधारले आहे. त्यामुळे लोकं अनेक चांगल्या आणि महागड्या गोष्टी विकत घेताना दिसून येत आहेत. त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. नुकताच सॅमसंग कंपनीने एक महागडा टीव्ही भारतात लॉन्च केला आहे. याची किंमत एखाद्या घरापेक्षा किंवा गाडीपेक्षा जास्त आहे. सॅमसंग कंपनीने भारतात आपला अल्ट्रा लक्झरी मायक्रो LED लॉन्च केला आहे. हा भव्य टीव्ही ११० इंचाचा आहे. हा केवळ आकारात नाहीतर किंमतीच्या दृष्टीने देखील मोठा आहे. मायक्रो एलईडी भारतातील निवडक रिटेल स्टोअर्स आणि Samsung.com वर उपलब्ध असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेक्नॉलॉजीचा हा अल्ट्रा लक्झरी भाग अल्ट्रा प्रीमियम डिस्प्ले हवा असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे असा कंपनीचा दावा आहे. मायक्रो एलीडीमध्ये लक्झरी इंटेरिअरमध्ये फिट यासाठी तयार करण्यात आलेले एक आकर्षक डिझाइन आहे. यात २४.८ दशलक्ष मायक्रोमीटर आकाराचे अल्ट्रा एलईडी वापरण्यात आले आहेत. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : Best Smartphones Under 15000: १५ हजार रूपयांमध्ये कोणकोणते स्मार्टफोन येतात माहितीये का? पाहा संपूर्ण यादी

डिझाइनच्या बाबतीती सॅमसंग टीव्हीमध्ये मोनोलिथ डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. यामुळे तो अनेक प्रकारच्या होम डेकोर मध्ये मिसळू शकतो. टीव्हीमध्ये अ‍ॅम्बियंट मोड+ देखील आहे जो टीव्हीला आर्ट डिस्प्ले वॉलमध्ये बदलू शकतो. तसेच सॅमसंगच्या या मोठ्या टीव्हीमध्ये AI अपस्केलिंग क्षमता आणि एरिना साउंडचे फिचर देखील देण्यात आले आहेत. जे चांगल्या दृश्याच्या अनुभवासाठी ३ डी साउंड देण्यासाठी ओटीएस प्रो, डॉल्बी एटमॉस आणि क्यू-सिम्फनी याना एकत्रितपणे जोडते.

सॅमसंग इंडियाचे व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहनदीप सिंग यांनी मायक्रो एलईडीच्या सुरुवातीसह ग्राहकांना एक अद्वितीय दृश्य अनुभव देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट व्यक्त केले. वापरकर्त्यांच्या आलिशान जीवनशैलीला पूरक असे या टीव्हीचे डिझाइन करण्यात आले आहे. सॅमसंगने लॉन्च केलेल्या मायक्रो एलईडीची किंमत तब्बल १,१४,९९,००० रुपये इतकी आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung launch ultra luxurious micro led india 110 inches and 11499000 rs check features tmb 01
Show comments