लास वेगास येथे होणाऱ्या CES 2023 साठी सॅमसंगने चार नवीन मॉनिटर्सची घोषणा केली आहे. ज्यामध्ये दोन हे गेमिंग मॉनिटर आणि कन्टेन्ट निर्मिती करणाऱ्यांसाठी एक मॉनिटर तसेच एक स्मार्ट मॉनिटर असणार आहेत. तसेच कंपनीने आणखी प्रॉडक्ट्सची घोषणा केली आहे. Odyssey Neo G9, Odyssey OLED G9, ViewFinity S9 कलर-कॅलिब्रेटेड मॉनिटर आणि स्मार्ट मॉनिटर M8 अशी ही प्रॉडक्ट्स असणार आहेत.

Samsung Odyssey Neo G9 gaming monitor

Odyssey Neo G9 हा जगातील पहिला ड्युअल UHD गेमिंग मॉनिटर आहे. ज्याचे नेटिव्ह रिझोल्यूशन ६८०×२,१६० पिक्सेल आणि ३२:९ चे वाईड अस्पेक्ट असणार आहे. हा ५७-इंचाचा मॉनिटर प्रीमियम १०००R कर्व्ह आकाराचा येतो. लाईट रिफ्लेक्शन कमी करण्यासाठी मॅट फिनिशसह VESA HDR1000 सर्टिफाईड असणार आहे. ज्यांना उच्च रिझोल्यूशन आणि उच्च रिफ्रेश रेटचा मॉनिटर हवा आहे. २४०Hz च्या पीक रीफ्रेश रेटसह, हा मॉनिटर वेगवान गेमर्ससाठी सर्वात योग्य आहे.

naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
ott new release Freedom at Midnight - SonyLIV Deadpool & Wolverine
या वीकेंडला ओटीटीवर पाहा थिएटरमध्ये गाजलेला ‘हा’ सिनेमा; सोबतीला आहे ऐतिहासिक वेब सीरिजसह थ्रिलरची मेजवानी
mukta barve entry in colors marathi serial
Video : ‘कलर्स मराठी’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत मुक्ता बर्वेची एन्ट्री! जबरदस्त लूक अन् प्रोमोने वेधलं लक्ष
tom cruise mission impossible 8 teaser released
Video : खोल समुद्रातील मिशन अन् जबरदस्त अ‍ॅक्शन; टॉम क्रूझच्या ‘Mission Impossible 8’ चा टीझर प्रदर्शित; सिनेमाची रिलीज डेटही ठरली
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत

हेही वाचा : Consumer Electronic Show 2023: लास वेगास येथे होणार वर्षातील सर्वात मोठा Tech Show; जाणून घ्या काय असेल खास?

Samsung Odyssey OLED G9 gaming monitor

Odyssey OLED G9 हा ३२:९ अस्पेक्ट रेशोसह ४९-इंची १८००R कर्व्ह OLED स्क्रीनसह हाय-एंड गेमिंग मॉनिटर देखील आहे. हा मॉनिटर प्रतिसाद करण्यासाठी ०.१ms इतका वेळ घेतो. २४० Hz रिफ्रेश रेटसह १,000,000:१ चा डायनॅमिक कॉन्ट्रास्ट रेशो सुद्धा हा मॉनिटर ऑफर करतो.हा गेमिंग मॉनिटर एक स्मार्ट टीव्ही म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. हा मॉनिटर स्मार्ट हबद्वारे प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स आणि YouTube सारख्या प्रमुख OTT अ‍ॅप्ससह सुसज्ज आहे. तसेच मॉनिटरमध्ये एक गेमिंग हब देखील आहे. एक ऑल-इन-वन गेम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जे Xbox आणि NVIDIA GeForce Now सारख्या सर्व्हिसद्वारे क्लाउड गेमिंगला देखील समर्थन देतं.

हेही वाचा : Whatsapp वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी; Pin Chat करण्याची मर्यादा वाढवली

Samsung ViewFinity S9

Samsung ViewFinity S9 हा मॉनिटर 99 टक्के DCI-P3 gamut coverage सह ५के रिझोल्युशन असलेला २९ इंचाचा हा मॉनिटर असणार आहे. या मॉनिटरला कॅलीब्रेट करण्यासाठी सॅमसंग स्मार्ट कॅलिब्रेशनचा वापर करू शकतो. यामध्ये USB-C आणि Thunderbolt 4 असणार आहे ज्यमुळे युजर्सना एकाच केबलवर MacBook Pro सारखे आधुनिक लॅपटॉप जोडू शकतात. तसेच गुगल मीट सारख्या अ‍ॅप्ससाठी ४के सारखा स्लिमफिट कॅमेरा देखील देतो.

Samsung Smart Monitor M8

सॅमसंगच्या या स्मार्ट मॉनिटर M८ मध्ये नेटिव्ह ४के रिझोल्युशन असून याला २७ इंचाचा डिस्प्ले असणार आहे. हा मॉनिटर डेलाइट ब्लू, स्प्रिंग ग्रीन, सनसेट पिंक किंवा वॉर्म व्हाइट या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. हा मॉनिटर सॅमसंगच्या स्मार्टथिंग्स आणि स्मार्ट हब शी कनेक्ट आहे. यामध्ये इतर मॉनिटरप्रमाणे M8 चा वापर नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ साठी केला जाऊ शकतो. हा मॉनिटरसुद्धा स्लिमफिट प्रकट येतो.