सॅमसंगने या वर्षी मार्चमध्ये गॅलॅक्सी एफ१५ (Galaxy F15) लाँच केला होता. त्याची सुरुवातीची किंमत १२,९९९ रुपये आहे. तर, या स्मार्टफोनसाठी कंपनीनं एक नवीन व्हेरिएंट लाँच केले आहे. जर तुम्हाला स्वस्तात मस्त अन् जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. कारण- सॅमसंग गॅलॅक्सीच्या या नवीन व्हेरिएंटमध्ये ८जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनची किंमत १५,९९९ रुपये आहे.

गॅलॅक्सी एफ१५ स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनमध्ये चार ॲण्ड्रॉइड ओएस (Android OS) अपग्रेड देण्यासह पाच वर्षांचं सिक्युरिटी अपडेट देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये ॲण्ड्रॉइड १४ आधारित One UI 6 सुद्धा आहे. तसेच हा स्मार्टफोन ॲश ब्लॅक, जॅझी ग्रीन व ग्रूवी व्हायोलेट अशा तीन रंगप्रकारांमध्ये उपलब्ध असेल.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप

हेही वाचा…व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर

हा स्मार्टफोन ९० एचझेड रिफ्रेश रेट आणि व्ही शेप नॉचसह (V-shaped notch) ६.५ इंच एफएचडी प्लस AMOLED डिस्प्लेसह येतो. तसेच मीडिया टेक Dimensity ६१०० प्लस ४/६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजसह ६ एनएम प्रोसेसरला सपोर्ट करतो. तसेच स्मार्टफोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड आहे; जो १ टीबीपर्यंत स्टोरेज एक्सपान्शन करू शकेल.

कॅमेरा –

स्मार्टफोनमध्ये ५० एमपी प्रायमरी कॅमेरा, ५ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स व २ एमपी मायक्रो लेन्ससोबत ट्रिपल कॅमेरा मागील सेटअपसह येतो. त्यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉटसह समोर १३ एमपी सेल्फी कॅमेरादेखील आहे. सॅमसंग गॅलॅक्सी एफ १५ मध्ये ६,००० mAh बॅटरी आहे; जी त्याच्या यूएसबी-सी पोर्टद्वारे २५ डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर, २० हजारांपेक्षा कमी किमतीत तुम्ही हा जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहात.