तंत्रज्ञान जगात रोज रोज नवनवे शोध समोर येत असतात. रोजच नव्या बाबींचा उलगडा होत असतो. दैनंदिन जीवनातील अडचणी समजून अनेक गॅझेट समोर येत असतात. आता सॅमसंगने आपला 35W पॉवर अडॉप्टर ड्युओ भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. 35W पॉवर अ‍ॅडॉप्टर ड्युओ हा एक वेगवान चार्जर आहे. एकाच वेळी दोन उपकरणे चार्ज करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. सॅमसंगचे म्हणणे आहे की, या 35W अडॅप्टरच्या मदतीने आयफोन, अँड्रॉईड फोन आणि टॅबलेट व्यतिरिक्त लॅपटॉप आणि स्मार्टवॉच देखील चार्ज करता येतील. सॅमसंगचा हा 35W अडॅप्टर वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. अ‍ॅडॉप्टरचा वायरलेस इअरबड्ससोबतही वापर केला जाऊ शकतो. याशिवाय पॉवर बँक देखील चार्ज करेल. यासोबत यूएसबी टाइप सी पोर्ट आणि यूएसबी टाइप ए चार्जिंग पोर्ट आहे.

अ‍ॅडॉप्टरने सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन कमीत कमी वेळेत ५० टक्के चार्ज करू शकतो, असा दावा कंपनीने आहे. सॅमसंग 35W पॉवर अडॅप्टर डुओची किंमत २,२९९ रुपये ठेवण्यात आली आहे. चार्जर ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो.

Moto G31: मोटोरोलाने 50 MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह स्मार्टफोन केला लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य

सॅमसंग 35W पॉवर अ‍ॅडॉप्टर ड्युओचा टाइप-सी पोर्ट 35W चार्जिंग करतो, तर टाइप-ए पोर्ट 15W चार्जिंग करतो. अ‍ॅप्पल प्रमाणेच सॅमसंगने फ्लॅगशिप डिव्हाइसमधून चार्जर काढून टाकला आहे, म्हणजेच फोनसोबतच्या बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध नसेल. कंपनीचे फोन फक्त टाइप-सी केबलसह बाजारात येत आहेत.

Story img Loader