Samsung Maintenance Mode Rolls Out: आपला फोन दुरुस्तीसाठी किंवा अपडेटसाठी एखाद्या सर्व्हिसींग सेंटरमध्ये देताना लोक अनेकदा विचार करतात. अनेकवेळा असा फोन देताना डेटा चोरीला जाण्याची भिती असते. काही वेळेस दुरुस्ती किंवा अपडेटदरम्यान फोन रीसेट होतो आणि सर्व खासगी डेटा डिलीट होण्याची भीतीही असते. मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने स्मार्टफोनचा स्पीकर बिघडल्याने दुरुस्तीसाठी दिलेल्या स्मार्टफोनमधून दोन लाखांचा गंडा घातल्याचं वृत्त समोर आलं होतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जितका वेळ फोन सर्व्हिस सेंटर असतो तितका वेळ युझर्स चिंतेत असतात अशी परिस्थिती अनेकदा पहायला मिळते. मात्र आता या समस्येवर सॅमसंग कंपनीने भन्नाट उपाय शोधून काढला आहे. त्यामुळे किमान सॅमसंगच्या युझर्सला तरी या डेटा चोरीपासून मुक्ती मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सॅमसंगने आपल्या स्मार्टफोनमध्ये एका नवीन फिचरची घोषणा केली आहे. या नव्या फिचरमुळे फोन सर्व्हिस सेंटरला देताना त्यामधील डेटा अधिक सुरक्षित ठेवता येणार नाही. या फिचरला कंपनीने ‘मेंटेनन्स मोड’ असं नाव दिलं आहे. हे फिचर सर्वात आधी वन यूआय फाइव्ह बीटा टेस्टींगसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार होतं. मात्र आता हे जगभरातील सॅमसंग युझर्ससाठी जारी करण्यात आलं आहे.

नेमकं कसं काम करतं हे फिचर?
सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार ‘मेंटेनन्स मोड’मध्ये फोनमधील डेटा अधिक सुरक्षित राहतो. या फिचरच्या मदतीने युझर्सला त्यांचे फोटो, मेसेज आणि फोन नंबर सुरक्षित ठेवता येणार आहेत. म्हणजेच आता फोन सर्व्हिस सेंटरला देताना घाबरण्याची आणि डेटा चोरीला जाण्याची भीती नाही.

‘मेंटेनन्स मोड’मध्ये यूझर्स त्यांची वेगळी प्रोफाइल बनवू शकतात. यामध्ये युझर्स त्यांचे फोटो, मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन, फोन नंबर आणि आर्थिक व्यवहार केले जाणारे अ‍ॅप्लिकेशन्स ठेऊ शकतात. त्यामुळे फोन सर्व्हिसिंगला दिल्यानंतर डेटाशी कोणत्याही पद्धतीची छेडछाड न करता फोन पुन्हा युझर्सला मिळणार आहे. सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार सॉफ्टवेअर अपडेटमधील हे अपडेट जगभरातील युझर्ससाठी जारी करण्यास सुरुवात झाली आहे. आता हे अपडेट सॅमसंगच्या वन यूआय फाइव्हवर चालणाऱ्या गॅलेक्सी एस २२ या स्मार्टफोनसाठीही जारी होणार आहे. हळूहळू सॅमसंगच्या सर्वच फोनमध्ये हे फिचर उपलब्ध होणार आहे.

कसे सुरु करावे हे फिचर?
तुम्ही सॅमसंगचा फोन वापरत असाल आणि तुम्हाला ‘मेंटेनन्स मोड’ सुरु करायचा असल्यास सेटींग पर्याय निवडावा लागाले. त्यामध्ये बॅटरी आणि डिव्हाइस केअर पर्याय निवडून त्यात हा मेंटेनन्स मोड पर्याय ऑन करावा. हा पर्याय ऑन केल्यानंतर फोन रिबूट करुन सर्व्हिसिंगसाठी सेंटरवर देता येईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung maintenance mode rolls out for galaxy phones to safe your data during service or repairing scsg
Show comments