जगातील स्मार्टफोन मार्केट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो. त्यात मोबाईल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये चढाओढ असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कंपन्या जगातील अनेक देशात आपलं जाळं घट्ट विणण्यासाठी योजना आखत आहेत. मोबाईल निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंग आता पाकिस्तानमध्ये उत्पादन सुरु करणार आहे. यामुळे पाकिस्तानात सरकार आणि उद्योगाला फायदा होणार आहे. भविष्यात पाकिस्तानात आयातीचं प्रमाण कमी होईल अशी आशा देखील आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाकिस्तानातील उत्पादन साइटला भेट दिली. त्यावेळी भविष्यातील योजनांबद्दल सांगण्यात आल्याचं डॉनने वृत्त दिलं आहे. पाकिस्तानात सॅमसंग कंपनीचा भागीदार असलेल्या लकी ग्रुपच्या अधिकाऱ्यांच्या मते, कंपनीचं दरवर्षी तीन दशलक्ष सेलफोन निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आहे.

पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (PTA) च्या आकडेवारीनुसार, चालू वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत ४५ दशलक्ष मोबाईल फोनच्या आयातीपेक्षा स्थानिक उत्पादन कारखान्यांद्वारे मोबाईल फोनचे उत्पादन जवळपास दुप्पट वाढून १८.८७ दशलक्ष झाले आहे. मोबाइल फोनच्या स्थानिक उत्पादनात वाढ झाली असली तरी आयात वरचढच आहे.

Nothing Ear 1 चं ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; क्रिप्टो करन्सीत पेमेंट करण्याची सुविधा

पीटीएचा आकडेवारीनुसार २०२१ च्या पहिल्या चार महिन्यांत (जुलै-ऑक्टोबर) ६४४.६७३ मिलियन अमेरिकन डॉलर्स किमतीचे मोबाइल फोन आयात करण्यात आले होते. मागील वर्षीच्या याच कालावधीत ५५७.९६१ मिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयात १५.५४ टक्क्यांनी वाढली आहे. सॅमसंग कंपनीच्या निर्णयामुळे पाकिस्तानात रोजगार, गुंतवणूक, निर्यातीला चालना मिळणार आहे.

Story img Loader