अॅप्पलने अलिकडेच आयफोन १४ सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमधील फोनमध्ये एक फीचर लक्षवेधी ठरले आहे. हे फीचर म्हणजे सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी. आता सॅमसंगही हे फीचर आपल्या फोनमध्ये टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आगामी काळात सॅमसंग फोनमध्ये पण सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी दिसून येईल.
ट्विटरवर टिप्सटर Ricciolo ने आपल्या ट्विटमधून सॅमसंग आपल्या स्मार्टफोनना सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी देण्याची योजना आखत असल्याची माहिती जाहीर केली आहे. लिकनुसार, पहिल्या फेजमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस सिरीज आणि सॅमसंग गॅलक्सी फोल्ड सिरीजमध्ये ही सुविधा मिळण्याची शक्यता आहे.
(Aadhaar number : आधार नंबरने बँक अकाउंट हॅक होतो का? यूआयडीएआय म्हणाले..)
अॅप्पलच्या या फोनला सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी
७ स्पटेंबर २०२२ ला अॅप्पलने आयफोन १४ सिरीज लाँच केली होती. यावेळी आयफोन १४, आयफोन १४ प्लस आणि आयफोन १४ प्रो आणि प्रो मॅक्स या फोन्ससह तीन स्मार्टवॉच आणि एअरपॉड लाँच करण्यात आले होते. वरील चारही फोनमध्ये अॅप्पलने सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी दिली आहे.
काय आहे हा फीचर?
सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीने फोन वापरणाऱ्याला सिग्नल नसताना फोन लावता येणार आहे. सध्या हे फीचर केवळ यूएस आणि कॅनेडाच्या लोकांना वापरता येणार आहे. भारत आणि इतर देशांमध्ये हे फीचर अद्याप लागू करण्यात आलेले नाही.