आजच्या काळामध्ये प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. आपली अनेक कामे हल्ली स्मार्टफोनच्या मदतीनेच होतात. डिजिटल पेमेंट करणे असेल, वीजबिल भरणे असे अशी अनेक कामे फोनच्या मदतीने पूर्ण होतात. तसेच प्रत्येक जण फोन खरेदी करत असताना त्याला आवश्यक असणारे फीचर्सची चौकशी करून फोन खरेदी करतो. काहीजणांना फोटोग्राफीची आवड असते. त्यासाठी ते चांगला कॅमेरा असणारा फोन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. चांगला कॅमेरा असणारा फोन खरेदी करताना तो कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे त्यात किती सेन्सर आहेत आणि अन्य गोष्टींची चौकशी करतो. आज आपण असे काही स्मार्टफोन्स पाहणार आहोत ज्यात कंपनी बेस्ट कॅमेरा क्वालिटी प्रदान करते.

Vivo X90 Pro

vivo x90 pro या फोनमध्ये तुम्हाला तीन कॅमेरे मिळणार आहेत. ज्यामध्ये ५० MP चा सोनीचा IMX989 प्रायमरी सेन्सर, ५० MP ची पोर्ट्रेट लेन्स आणि १२ MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही फोनमध्ये सेलफिसाठी ३२ MP चा कॅमेरा तुम्हाला वापरायला मिळणार आहे. तुम्ही हा फोन काळ्या रंगात खरेदी करू शकता. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८४,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन वापरकर्ते फ्लिपकार्ट, विवोची अधिकृत वेबसाईट आणि इतर स्टोअर्समधून खरेदी करू शकतात.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Vallari Viraj
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बालपणीचे गोंडस फोटो; नेटकरी म्हणाले, “अशीच आयुष्यभर…”
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क
maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar reached in Nepal for movie shooting
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरचा येणार नवा चित्रपट, चित्रीकरणासाठी पोहोचला ‘या’ देशात
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?

हेही वाचा : गुगलने ‘या’ युजर्ससाठी लॉन्च केले Dark Web Report फिचर; जाणून घ्या कसे सेट करायचे?

Samsung Galaxy S23 Ultra

Galaxy S23 Ultra हा स्मार्टफोन हा सॅमसंग गॅलॅक्सी सिरीजमधील सर्वात प्रीमियम आणि महागडा स्मार्टफोन आहे. यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप येतो. तसेच याचा कॅमेरा या २०० मेगापिक्सलचा आहे. हे या फोनचे सर्वात महत्वाचे फिचर आहे. यात 3x आणि 10x ऑप्टिकल झूम सह १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड आणि दोन १० मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेन्स आहेत. १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा यामध्ये मिळणार आहे. या फोनमधून दिवसा आणि रतरी काढण्यात आलेल्या फोटोंची क्वालिटी ही चांगलीच असणार आहे. कमी प्रकाशामध्ये फोटो काढण्याची समस्या यामुळे दूर होणार आहे.

Vivo V27 Pro

Vivo V27 pro या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा , ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेटअप मिळणार आहे. वापरकर्त्यांना यामध्ये सेल्फी व व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी ५० मेगापिक्सलचा इतका कॅमेरा मिळणार आहे. vivo च्या या स्मार्टफोन्समध्ये ग्राहकांना लग्नासाठी वेडिंग स्टाईल पोर्ट्रेट कॅमेरा फिल्टर्स मिळणार आहेत. यासह नाईट फोटोग्राफीसाठी ऑरा लाईट सपोर्ट उपलब्ध असणार आहे. ज्यामुळे तुम्ही फ्लॅशलाईटच्या मदतीने रात्रीही चांगले फोटो काढू शकता. Vivo V27 Pro ची किंमत ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ही ३९,९९९ रुपये इतकी आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही ४२,९९९ रुपये इतकी असणार आहे.

हेही वाचा : ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असणारा Vivo चा ‘हा’ स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च, काय असणार फीचर्स?

बार्सिलोनो येथे सुरु असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस म्हणजेच MWC 2023 या शो मध्ये Xiaomi ने आपली Xiaomi १३ ही सिरीज लॉन्च केली आहे. Xiaomi 13 Pro मध्ये कंपनी तुम्हाला DSLR कमरेच्या लेव्हलचा कॅमेरा देणार आहे. भारतात येणाऱ्या फोनचा कॅमेरा Leica ब्रॅंडिंगसह येणार आहे. त्यामध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचे तीन कॅमेरे असतील. तसेच वापरकर्त्यांना यामध्ये OIS फिचर देखील मिळेल ज्यामुळे तुम्ही यामधून स्मूथ व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकणार तसेच या फोनला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा येणार आहे. Xiaomi 13 Pro 5G या स्मार्टफोनची १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही ७९,९९९ रुपये आहे.

OPPO Reno 10 Pro Plus

ओप्पो रेनो १० प्रो प्लस या फोनमध्ये सारखाच रिअर कॅमेरा सेटअप असणार आहे. ४ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेऱ्यासह, यामध्ये 3x ऑप्टिकल झूम, OIS आणि 120x हायब्रिड झूम मिळणार आहे. शिवाय यामध्ये , OIS आणि सर्व पिक्सल फोकससाठी मोठ्या सेन्सरसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात ११२ डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यूसह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा देखील देण्यात आला आहे.रेनो १० प्रो + ४के व्हिडिओसाठी कॅमेरा अल्गोरिदम वापरते. ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी मिळणार आहे. यात सेल्फीसाठी वाईड सेन्सर आणि ९० डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यू देखील मिळेल.