सध्या टेक क्षेत्र हे मोठ्या संकटांचा सामना करताना दिसत आहे. त्याबद्दलचे अपडेट्स लोकांपासून लपून राहिलेले नाहीत. खर्च कमी करण्यासाठी आणि चालू असलेल्या जागतिक आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभ्रमधील कंपन्या काही कठोर उपाय करताना दिसत आहेत. Amazon, Google, Meta, Twitter आणि Salesforce सारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे. तर इतर अनेक कंपन्या आपले खर्च कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. टेक कंपनी Samsung देखील याबाबत काई कठोर पावले उचलली आहेत.
गेल्या वर्षांमध्ये सॅमसंग कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सरासरी ९ टक्के वेतनवाढ देण्याचे मान्य केले होते. मात्र यंदा सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांना फक्त सरासरी ४.१ टक्के पगारवाढ मिळणार आहे. म्हणजेच मागील वर्षीपेक्षा यंदा कमी पगारवाढ होणार आहे. तसेच या टेक कंपनीने यावर्षी बोर्ड मेंबरच्या सदस्यता वाढीवर देखील स्थगिती आणली आहे. IANS च्या अहवालातून असे समोर आले आहे की, खराब कामगिरी आणि जागतिक आर्थिक मंदीच्या कारणांमुळे हे पाऊल कंपनीकडून उचलण्यात आले आहे.
हेही वाचा : समस्या सांगा अन् झटक्यात उत्तर मिळवा, शेतकऱ्यांसाठी आता लॉन्च झाला KissanGpt; जाणून घ्या
दरम्यान, सॅमसंगने मागील वर्षी केलेली ९ टक्क्यांची वेतनवाढ ही मागच्या दशकांमधील सर्वोच्च वेतनवाढ होती. मात्र कंपनीने रेव्हेन्यू नोंदवल्यानंतर कंपनीच्या कामगारांनी १६ टक्के पगारवाढीची मागणी केली होती. त्यानंतर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत वेतन आणि इतर कामगार धोरणांबाबत करार केला होता. ज्यामध्ये गरोदर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास कमी करणे अशा धोरणांचा समावेश होता.
सॅमसंगने AI वर केले लक्ष केंद्रित
सॅमसंग कंपनी देखील आता AI वर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. तसेच या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर फायद्यासाठी करून घेण्यास कंपनी उत्सुक असल्याचे दिसते. सॅमसंग ChatGpt सारखेच AI विकसित करत आहे ज्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोडिंग करण्यामध्ये मदत होईल अशा प्रकारचे वृत्त आले होते. याबाबत अजून कोणीतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.