Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ॲमेझॉन, फ्लिपकार्टनंतर आता सॅमसंग कंपनीनेसुद्धा सेल जाहीर केला आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शानदार ऑफर्स आणल्या आहेत. सॅमसंग इंडिया स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि घरातील काही उपयोगी वस्तूंसह काही उत्पादनांवर आकर्षक सवलती आणि सूट ऑफर करत आहे. कोणत्या वस्तूंवर किती सूट असणार आहे, चला पाहूया.

सेलदरम्यान ग्राहक एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ॲक्सीस बँक आदी बँकांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून २२.५ टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकतात. सॅमसंग त्यांच्या लोकप्रिय गॅलेक्सी ए, एम, एफ आणि एस मालिकेतील स्मार्टफोन्स तसेच फ्लॅगशिप गॅलेक्सी झेड फोल्डेबल फोनवर ५७ टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. गॅलेक्सी एस२३ (Galaxy S23) फोन ५४,९९९ रुपयांच्यापेक्षा कमी किमतीत तुम्ही या सेलमध्ये विकत घेऊ शकणार आहात.

TRAI intervention: Jio, Airtel, Vi launch revised voice-only recharge plans
युजर्ससाठी आनंदाची बातमी; महागड्या रिचार्जपासून दिलासा! TRAI च्या कारवाईनंतर Jio-Airtel-VI-BSNL ने कमी केल्या किंमती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Countrys first lithium refinery and battery manufacturing plant in Butibori
रोजगार संधी! बुटीबोरीत देशातील पहिला लिथियम रिफायनरी, बॅटरी उत्पादन कारखाना
How to send WhatsApp messages without save a number know 5 easy methods
मोबाइल नंबर सेव्ह न करता WhatsApp मेसेज कसा पाठवायचा? जाणून घ्या पाच सोप्या पद्धती…
thief stealing mobile phones from passengers at swargate st station arrested
एसटी स्थानकात प्रवाशांकडील मोबाइल चोरणारा गजाआड; ४३ मोबाइल संच जप्त
IMEI Number for mobile phone
चोरी गेलेला मोबाईल पुन्हा मिळवण्यासाठी IMEI नंबर आहे महत्त्वाचा, कसा मिळवाल ‘हा’ क्रमांक? जाणून घ्या
Republic Day Sale Realme GT 6 Get massive discount
Republic Day Sale : रिअलमीच्या ‘या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; मिळवा सात हजारांपर्यंतची सवलत
sambhav
भारतीय लष्कर वापरत असलेला संभव स्मार्टफोनमध्ये कोणत्या खास गोष्टी आहेत? जाणून घ्या…

लॅपटॉप डीलमध्ये गॅलेक्सी बूक गो, गॅलेक्सी बुक ३ सीरिज आणि गॅलेक्सी बुक ३ प्रो मॉडेल्सवर ४६ टक्क्यांपर्यंत सूट असणार आहे. गॅलेक्सी टॅब्लेट, वेअरेबल आणि ॲक्सेसरीजच्या निवडक मॉडेल्सवर ५० टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

हेही वाचा…आता स्मार्टवॉच विसरा! सॅमसंगची ‘ही’ अंगठी करणार हेल्थ ट्रॅक; पाहा कसे असतील फीचर्स

सॅमसंग प्रीमियम आणि लाइफस्टाइल टीव्ही मॉडेल्सवर १५,२५० रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त एक्स्चेंज फायद्यांसह ४८ टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. सॅमसंगच्या QLED टीव्हीच्या निवडक मॉडेल्सवर १,२४,९९० रुपये किमतीचा गॅलेक्सी एस२३ अल्ट्रा स्मार्टफोन किंवा ६९,९९० रुपये किमतीचा ५० इंचाचा सेरिफ टीव्ही किंवा ३८,९९० रुपये किमतीचा साउंडबार यांसारख्या मोफत भेटवस्तूंसह ग्राहकांना मिळण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

स्वयंपाकघरातील काही उपयोगी वस्तूंवरसुद्धा सूट आहे. सॅमसंगच्या काही निवडक रेफ्रिजरेटर मॉडेलवर ५२ टक्के सूट आणि १५,१२५ रुपयांपर्यंतचे एक्स्चेंज फायदेसुद्धा उपलब्ध आहेत. मायक्रोवेव्ह डीलमध्ये २८ लिटर स्लिमफ्राय (SlimFry) आणि ३२ लीटर बेस्पोक (Bespoke) मॉडेल्सवर ४५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच वॉशिंग मशीनवर ४९ टक्क्यांपर्यंत सूट आणि ३००० रुपयांचा अपग्रेड बोनससुद्धा आहे. सर्व ग्राहक सॅमसंग ऑनलाइन स्टोअर Samsung.com, सॅमसंग शॉप ॲप आणि देशभरातील ऑफलाइन सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्सवर या सेलचा लाभ घेऊ शकणार आहेत.

Story img Loader