दक्षिण कोरियामधील बहुराष्ट्रीय कंपनी सॅमसंगने आपल्या सॅमसंग गॅलक्सी ए मालिकेअंतर्गत Samsung Galaxy A04e स्मार्टफोन गुपचूप लाँच केला आहे. कंपनीने अलीकडेच या मालिकेतील Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04s स्मार्टफोन लाँच केल्यामुळे या मालिकेतील हा तिसरा स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये…
वैशिष्ट्ये
हा स्मार्टफोन ६.५ -इंचाच्या HD डिस्प्लेवर लॉन्च करण्यात आला आहे, जो पॅनेलवर बनवला आहे. सॅमसंगने या फोनच्या स्क्रीनला इन्फिनिटी ‘V’ असे नाव दिले आहे, सॅमसंगच्या या स्मार्टफोनची परिमाणे १६४.२ x ७५.९ x ९.१ मिमी आणि वजन १८८ ग्रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये १२-नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार केलेला MediaTek Helio G35 चिपसेट आहे. त्याच वेळी, हा मोबाईल फोन ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 GPU ला सपोर्ट करतो.
आणखी वाचा : दिवाळीच्या तोंडावर Apple ने दिला ग्राहकांना झटका! आयपॅड मिनीच्या किमतीत केली वाढ! आता मोजावे लागणार…
बॅटरी
या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी पर्यंतची रॅम, १२८ जीबीपर्यंत अंतर्गत स्टोरेज देण्यात आली आहे. ५०००mAh बॅटरी सारखी वैशिष्ट्ये असतील. Samsung Galaxy A04e Android 12 वर लॉन्च करण्यात आला आहे जो OneUI Core ४.१ सह एकत्र काम करतो. हा स्मार्टफोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो आणि 4G LTE वर काम करतो.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या मागील पॅनलवर, एलईडी फ्लॅशसह सुसज्ज आहे. १३-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आहे, जो एफ / २.४ अपर्चरसह २-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरच्या संयोजनात कार्य करतो. त्याचप्रमाणे हा स्मार्टफोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी F/२.२ अपर्चरसह ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन ब्लॅक, ऑरेंज कॉपर आणि लाइट ब्लू कलरमध्ये लॉन्च केला आहे, ज्याची किंमत येत्या काही दिवसांत समोर येईल.