दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारतातील सर्व कंपन्या दिवाळीची भेट म्हणून आपल्या ग्राहकांसाठी काहीतरी खास उत्पादने लाँच करतात. त्यात भरभक्कम ऑफर देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतात. नुकतचं सॅमसंग कंपनीनं बाजारात आपल्या ए मालिकेअंतर्गत ‘Samsung Galaxy A04e’ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. तुम्ही जर सॅमसंग प्रेमी असाल तर या स्मार्टफोन बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

काय आहे खास फिचर्स ?

Samsung Galaxy A04e हा एक बजेट डिव्हाइस असेल, जो कंपनीने एंट्री लेव्हल वापरकर्त्यांसाठी जारी केला आहे. हा हँडसेट Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04s च्या श्रेणीतील आहे. फोनमध्ये फुल स्क्रीन डिस्प्ले, वॉटर ड्रॉप नॉच आणि १३ एमपी रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी ५०००mAh बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोन तीन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. यामध्ये ३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज, ४ जीबी रॅम+ ६४ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे.

खास आहे कॅमेरा !

फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा मुख्य लेन्स १३ एमपी आहे. दुय्यम लेन्स २ एमपीचा आहे. याशिवाय मागील बाजूस एलईडी फ्लॅश (led flash) देण्यात आला आहे. फ्रंटमध्ये कंपनीने ५ एमपी सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी ५०००mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर Samsung Galaxy A04e मध्ये ६.५ इंचाचा HD + LCD डिस्प्ले आहे, जो इंफिनीटी-व्ही नॉचसह येतो. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो. मात्र सॅमसंगने त्याचे नाव जाहीर केलेले नाही.

आणखी वाचा : Redmi Note 12 Series: Xiaomi लवकरच सादर करणार Redmi Note 12 मालिका; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

सध्या ‘हे’ कलर्स आहेत उपलब्ध

हा फोन तुम्ही ब्लॅक, ऑरेंज कॉपर आणि लाइट ब्लू रंगात खरेदी करू शकता. या स्मार्टफोनचे वजन १८८ ग्रॅम आहे. यात मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट, ३.५ मिमी ऑडिओ जॅक पोर्ट आणि ड्युअल सिम सपोर्ट आहे. डिव्हाइसमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला नाही.

किंमत

हा स्मार्टफोन १३,४९९ रुपयांच्या किंमतीत ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Story img Loader