सॅमसंग कंपनीचा पॅरिसमध्ये १० जुलै रोजी अनपॅक्ड इव्हेंट (Unpacked event) होणार आहे. या इव्हेंटआधी सॅमसंगच्या आगामी फोल्ड करण्यायोग्य डिव्हायसेस, गॅलेक्सी झेड फोल्ड ६ व गॅलेक्सी झेड फ्लिप ६ बद्दलची माहिती समोर आली आहे. या गॅलेक्सी झेड फोल्ड ६ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप ६ (Galaxy Z Fold 6 And Galaxy Z Flip 6) दोन्ही फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आणि दोन्ही स्मार्टफोनमध्ये २५ डब्ल्यू जलद चार्जिंगसाठी समर्थनासह बॅटरी ४,४०० एमएएच युनिट असण्याची अपेक्षा आहे.

द फायनान्शियल एक्सप्रेस यांच्या वृत्तानुसार, बाहेरील डिस्प्लेवरील बेझल लहान आणि इतर मॉडेल्सच्या तुलनेत स्लिम असणार आहे; ज्याचे वजन Z Fold 5 च्या 253g च्या तुलनेत 239g असेल. गॅलेक्सी झेड फोल्ड ६ मध्ये २१६० x १८५६ पिक्सेल (स्मार्ट प्रिक्सद्वारे) रिझोल्युशनसह ७.६ इंच डायनॅमिक AMOLED, कव्हर डिस्प्ले ९८६ x २३७६ पिक्सेलच्या रिझोल्युशनसह ६.३ इंच स्क्रीन व १२ जीबीपर्यंत रॅम देण्यात येईल. कॅमेरा क्षमतेच्या बाबतीत गॅलेक्सी झेड फोल्ड ६ मध्ये OIS सह ५० एमपी प्रायमरी सेन्सर, १२ एमपी अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स व 3x ऑप्टिकल झूमसह १० एमपी टेलिफोटो लेन्ससह तिहेरी कॅमेरा सेटअप असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी, डिव्हाइस १० एमपी कव्हर कॅमेरा आणि आतील बाजूस ४ एमपी अंडर-डिस्प्ले सेन्सर देऊ शकते.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Airtel tariffs hikes, Airtel increases tariffs
Airtel Announces Mobile Tariff Hike: जिओ मागोमाग एअरटेलचीही मोबाइल सेवा महागली! २८ दिवस ते एक वर्षाच्या प्लॅन्ससाठी ‘असे’ आहेत नवे दर
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Meta AI in whatsapp
Meta AI in WhatsApp: आता AI थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर; वाट्टेल ते विचारा, ते सगळं सांगेल! वाचा नेमकं वापरायचं कसं?
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

हेही वाचा…Airtel Announces Mobile Tariff Hike: जिओ मागोमाग एअरटेलचीही मोबाइल सेवा महागली! २८ दिवस ते एक वर्षाच्या प्लॅन्ससाठी ‘असे’ आहेत नवे दर

दुसरीकडे गॅलेक्सी झेड फ्लिप ६ मध्ये २६०० x १०८० पिक्सेलच्या रिझोल्युशनसह ६.७ इंच डायनॅमिक AMOLED मुख्य डिस्प्ले आणि १२० एचझेड रीफ्रेश रेट याव्यतिरिक्त ७२० x ७४८ पिक्सेल रिझोल्युशनसह ३.४ इंचांचा सुपर AMOLED कव्हर डिस्प्ले असेल. तसेच स्मार्टफोन २५६ जीबी व ५१२ जीबी स्टोरेज या दोन व्हेरिएंटमध्ये येईल. तर कॅमेऱ्यामध्ये ५० एमपी प्रायमरी सेन्सर आणि १२ एमपी अल्ट्रा-वाइड-अँगलचा समावेश असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी, १० एमपी फ्रंट कॅमेरा, २५ डब्ल्यू जलद चार्जिंगला सपोर्ट असणारी ४,००० एमएएचची बॅटरी असणार आहे.

कंपनी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड हे मॉडेल सहा रंगांमध्ये सादर करू शकते. त्यात ब्ल्यू, मिंट, यलो, सिल्व्हर शॅडो, व्हाइट व क्राफ्टेड ब्लॅकचा समावेश आहे. गॅलेक्सी झेड फ्लिप ६ फोन पिंक, नेव्ही, सिल्व्हर शॅडो, पीच, व्हाइट व क्रॉफ्टेड ब्लॅक या सहा रंगांमध्ये येऊ शकतो. सॅमसंग कंपनी त्यांच्या पॅरिस अनपॅक्ड इव्हेंटमध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड ६ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप ६ (Galaxy Z Fold 6 And Galaxy Z Flip 6)बरोबर गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा वॉच ७, गॅलॅक्सी स्मार्टवॉच बड्स ३ व बाँड्स 3 प्रो एअरबड्सदेखील लाँच करू शकते.