सॅमसंगने अलीकडेच आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीज अंतर्गत ‘सॅमसंग गॅलेक्सी एम32’ प्राइम एडिशन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. त्याच वेळी, सॅमसंग आता याच सीरीज अंतर्गत भारतात आणखी एक नवीन मोबाईल फोन ‘Samsung Galaxy M23 5G’ लाँच करणार आहे. Samsung Galaxy M23 5G फोनचे सपोर्ट पेज कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर पाहिले गेले असून Samsung Galaxy M23 5G फोन येत्या काही दिवसात भारतात लाँच होईल, असे सांगितले जात आहे.

यासोबतच कंपनी दोन नवीन उपकरणे Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04e देखील सादर करू शकते. या दोन्ही उपकरणांसह, Samsung Galaxy M23 5G टिपस्टर सुधांशूने Samsung वेबसाइटवर पाहिले आहे.

आणखी वाचा : ‘Google Pixel 7a’ Tensor G2 चिपसेटसह लाँच होणार; फीचर्स आले समोर

Samsung Galaxy M23 5G स्पेसिफिकेशन्स आणि वैशिष्ट्ये

  • या स्मार्टफोनमध्ये कंपनी फुल एचडी + रिझोल्युशन सह ६.६-इंचाचा IPS LCD पॅनल ऑफर करणार आहे. हा डिस्प्ले १२०Hz च्या रिफ्रेश रेटसह येईल. प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये Snapdragon 750G चिपसेट पाहायला मिळेल.
  • कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ५०-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा लेन्स, ८-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा लेन्स आणि २-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर मिळण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८-मेगापिक्सलचा लो फ्रंट कॅमेरा लेन्स दिला जाईल.
  • बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर कंपनी फोनमध्ये ५,०००mAh बॅटरी देणार आहे, जी २५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. OS बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन Android 12 वर आधारित OneUI ४.१ वर काम करेल.

Samsung Galaxy M23 5G किंमत

कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, हा फोन 5G आणि 4G दोन्ही प्रकारांमध्ये ऑफर केला जाऊ शकतो. याशिवाय फोनमध्ये सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असेल. या स्मार्टफोनची किंमत २०,००० रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Story img Loader