पृथ्वीच्या आत काय आहे, पोकळी आहे का, की पाण्याचे मोठे भांडार आहे. या गोष्टी शास्त्रज्ञांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. यावर माहिती मिळवणे सुरूच असून आता याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये शास्त्रज्ञांना पृथ्वीखाली पाण्याचा मोठा साठा सापडला आहे. हा साठा पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील सर्व महासागरांच्या आकारमानाच्या तिप्पट आहे. फ्रॅन्कफर्ट येथील संशोधकांनी याविषयावर आभ्यास केला. यातून ही माहिती समोर आली.

हा पाण्याचा साठा पृथ्वीच्या आतील भागातील अप्पर आणि लोअर मॅन्टलच्या मधात असणाऱ्या ट्रान्झिशन झोनमध्ये सापडला आहे. संशोधकांना एका दुर्मिळ हिऱ्याचा तपास केल्यानंतर ही माहिती मिळाली आहे. हा हिरा आफ्रिकेतील आहे. त्याची निर्मिती ही पृथ्वीच्या आत ६०० किमी खोलात ट्रान्झिशन झोन आणि लोअर मॅन्टल जिथे मिळतात त्या ठिकाणी झाली होती. या ठिकाणी रिंगवुडाईट नावाचा खनिज मोठ्या प्राणात असतो.

(भारताच्या मंगळ मोहिमेला ब्रेक? ‘या’ मोठ्या समस्येमुळे मंगळयानाशी संपर्क तुटला)

हिऱ्यामध्ये रिंगवुडाईट असल्याचे समोर आले आहे. रिंगवुडाईटमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. शिवाय हिऱ्याची रासायनिक रचनेची देखील माहिती मिळाली आहे. तसेच जगातील कुठल्याही बेसाल्ट खडकामध्ये आढळणाऱ्या मॅन्टल दगाडासारखाच हा हिरा आहे. यातून हा हिरा पृथ्वीच्या मॅन्टलमधील सामान्य तुकड्यापासून निर्माण झाला आहे, हे स्पष्ट होते.

संशोधनातून पृथ्वीखालील ट्रान्झिशन झोन हा सुका भाग नसून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचे स्पष्ट होते, असे फ्रँकफर्टमधील गोएथे विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर जिओसायन्सेसचे प्राध्यापक फ्रँक ब्रेंकर यांनी सांगितले. याने जुल्स वर्ण यांच्या पृथ्वीखालील समुद्राच्या कल्पनेच्या जवळपास अपण पोहोचलो आहे. मात्र फरक इतकाच की, पृथ्वीखाली महासागर नाही, पण जलयुक्त खडक आहेत, असे ब्रेन्कर म्हणाले.

Story img Loader