Google Search Alert: आज आपल्या दैनंदिन जीवनाचा गुगल हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण छोट्या-मोठ्या सर्वच गोष्टी जाणून घेण्यासाठी गुगलवर सर्च करत असतो. कारण, गुगलवर अवघ्या काही सेकंदात जगभरातील सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. पण गुगलचा वापर जपून केला नाही तर ते धोक्याचं ठरू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च (google search) केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत गुगल सर्च (Internet Browsing) करताना अशा चुका करणे टाळावे. जाणून घेऊया, कोणत्या गोष्टी Google वर शोधल्यास तुम्हाला महागात पडू शकतं.
चुकूनही Google वर ‘अशा’ गोष्टी सर्च करू नका
- चाइल्ड पॉर्नोग्राफी (Child Pornography)
चाइल्ड पॉर्नोग्राफी हा अतिशय संवेदनशील विषय आहे. गुगलवर चाइल्ड पॉर्न सारख्या गोष्टी शोधणे देखील गुन्हा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारत चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत खूप कडक आहे आणि त्यासंबंधीच्या कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. पॉक्सो एक्ट २०२१च्या (POSCO Act 2021) कलम १४ अंतर्गत चाइल्ड पॉर्न पाहणे आणि शेअर करणे हे दोन्ही प्रमुख गुन्हे आहेत.
(हे ही वाचा : …म्हणून नवीन वर्षात वापरता येणार नाही 5G सेवा )
- बॉम्ब बनविण्याची प्रक्रिया (Bomb-Making Process)
आजची युवापिढी गुगलवर काय काय सर्च करेल हे सांगणे अवघड आहे. काही लोक गुगलवर अशाही गोष्टी सर्च करतात, ज्या सर्च करणं चांगलंच महागात पडू शकतं. सायबर सेलच्या नजरेतून असं सर्च करणारे युजर्स वाचू शकत नाही. बॉम्ब बनवणं अशा गोष्टी सर्च केल्यानंतर त्या अलर्ट मोडमध्ये जातात. यामुळे कारवाई झाल्यास थेट जेलमध्ये जावं लागू शकतं.
- पिडीतेचे नाव (Sharing A Victim’s ID)
काही अशी प्रकरणे असतात ज्यामध्ये पिडीतेचे नाव हे लपवून ठेवले जाते. परंतु अशी अनेक लोक असतात, जे गुगलवर या पिडीत लोकांची फोटो आणि नाव शोधत असतात आणि ही माहिती मिळताच ते आॅनलाईन पोस्ट देखील टाकत असतात. परंतु अशा लोकांवर पोलिसांची नजर पडल्यास त्यांच्यावर थेट कारवाई होऊ शकते.
(हे ही वाचा : Flashback 2022: २०२२ मध्ये भरपूर मनोरंजनासाठी ‘हे’ ठरले Best Audio Devices; पाहा यादी)
- चित्रपट पायरसी (Film Piracy)
नवा एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज आली की लगेच ती फुकटात पाहण्यासाठी अनेकजण धडपड करतात. मग तो विविध संकेतस्थळावरून मिळविण्यासाठी अनेक सर्च केल्या जातात. पण, तुम्हाला माहिती आहे का चित्रपट पायरसी हा गुन्हा आहे. त्यामुळे गुगलवर चित्रपटाचे पायरेटिंग संबंधित काहीही शोध घेतल्यास, तुरुंगवास होऊ शकतो. तसेच, तुम्हाला दंड देखील होऊ शकतो.
- गर्भपात (Abortion)
गुगलवर गर्भपाताच्या पद्धती शोधणे देखील गुन्हा मानला जाऊ शकतो. म्हणूच अस काही तरी शोधणे टाळा. गुगलवर गर्भपाताच्या पद्धती शोधल्या तर काळजी घ्या कारण असे करणे कायदेशीर गुन्हा आहे. भारतीय कायद्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात करता येत नाही.