things to check before buying a used iPhone : आयफोन घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण, किंमत जास्त असल्यामुळे प्रत्येक जण आयफोन घेऊ शकत नाही. त्यामुळे काही जण सेकंड हॅण्ड आयफोन घेण्याचा विचार करतात. सेकंड हॅण्ड आयफोन घेणे काही वाईट नाही. पण, त्यासाठी तुम्हाला आयफोनमधील काही गोष्टी चेक करणे गरजेचे आहे; अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते आणि अर्ध्यापेक्षा जास्त पैसे तुमचे हा नवीन आयफोन दुरुस्त करण्यात जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेकंड हॅण्ड आयफोन घेताना घ्यावयाची काळजी खालीलप्रमाणे…

सीरियल नंबर कसा चेक करायचा?

आयफोन वॉरंटी कालावधीमध्ये आहे का हे तपासण्यासाठी सर्वांत आधी आयफोनच्या सेटिंगमध्ये जा. त्या ठिकाणी जनरल ऑप्शनमध्ये जा. त्यानंतर अबाउट सेक्शनवर क्लिक करा. या ठिकाणी iPhone चा सीरियल नंबर तुम्ही चेक करू शकतात. हा सीरियल नंबर कॉपी करून Apple च्या अधिकृत वेबसाइटवर टाकल्यावर सर्व डिटेल्स मिळतील. त्यामध्ये अॅक्टिव्हेशन डेटा, वॉरंटी पीरियड यांचा समावेश असतो.

आयफोन व्यवस्थित चेक करा

तुम्ही सेकंड हॅण्ड आयफोन खरेदी करणार असल्यास, डील करण्यापूर्वी डिव्हाइसची प्रत्यक्ष तपासणी करणे अधिक चांगले ठरेल. कोणत्याही स्क्रॅच नाही ना हे तपासून घ्या. असे केल्याने तुम्हाला डील करताना किंमत करण्यासाठी तुम्हाला आणखी एक कारण मिळेल.

हेही वाचा…Android वरून iPhone वर चॅट्स, फोटो कसे ट्रान्सफर करायचे? फक्त या सोप्या स्टेप्स फॉलो करा

डिस्प्ले खरा आहे का तपासून घ्या

आयफोन घेताना डिस्प्ले, बॅटरी तपासायला विसरू नका. आयफोनच्या डिस्प्ले अनधिकृत सर्व्हिस सेंटरवर बदलला/दुरुस्त केला गेला आहे की नाही तपासण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ट्रूटोन फीचर; जी iPhone 7 सीरिजमध्ये उपलब्ध आहे. हे तपासण्यासाठी आयफोनच्या सेटिंग्जवर जा आणि डिस्प्ले व ब्राइटनेसवर क्लिक करा. आता तुम्ही ट्रू टोन सुरू करू शकता. जर तुम्ही तसे करू शकत नसाल, तर आयफोन दुरुस्त केला गेल्याची दाट शक्यता आहे.

तसेच, फेस आयडी (iPhone X आणि नवीन मॉडेल्सवर उपलब्ध) काम करीत आहेत ना याची खात्री करून घ्या. आयफोन फेस आयडी नोंदणी करण्यात अयशस्वी झाल्यास, डिस्प्ले किंवा फेस आयडी सिस्टीममध्ये समस्या असू शकते. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.

बॅटरी तपासून घ्या

प्रत्येक फोनसाठी बॅटरी ही आवश्यक असते. आयफोनच्या बॅटरी ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात चांगल्या स्थितीत असल्यास तो आयफोन विकत घेण्यास काहीच हरकत नाही; पण त्यापेक्षा त्या बॅटरीची क्षमता कमी असल्यास विचार करून निर्णय घ्या. आयफोनची बॅटरी चेक करण्यासाठी आयफोनच्या सेटिंगमध्ये जा. त्या ठिकाणी बॅटरीचा पर्याय असतो. त्यावर क्लिक करा. बॅटरी हेल्थ आणि चार्जिंग या पर्यायावर क्लिक करा. जर तुम्ही बॅटरीची स्थिती चेक करू शकत नसाल, तर तो आयफोन खोटा आहे हे लक्षात घ्या.

कॅमेरा सिस्टीम

बऱ्याच मॉडर्न आयफोन्समध्ये मागे किमान दोन कॅमेरे असतात; तर Pro iPhones मध्ये तीन कॅमेरे असतील. कॅमेरा ॲप उघडा आणि कॅमेऱ्याची सर्व फंक्शन्स अपेक्षेप्रमाणे काम करीत आहेत का याची खात्री करा. वापरलेल्या iPhone मधील कॅमेरे अबाधित असल्याची खात्री करण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा.

त्यामुळे ड्युप्लिकेट बॅटरी किंवा स्क्रीन असलेला आयफोन विकत घेणे टाळा. कारण- त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second hand iphone buying tips things to do not to do these are some aspects to keep an eye on while getting a used iphone asp