अलिकडे हॅकिंगच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेवर (AIIMS) सायबर हल्ला झाल्याचे समोर आले होते. ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचा डेटा हॅक झाल्याचेही काही अहवलांतून समोर आले होते. अशात युजर्सनी आणि कंपन्यांनी डेटा सुरक्षित ठेवणे गरजेचे झाले असून खाजगी माहिती हॅकर्सच्या हाती लागू नये यासाठी उपयायोजना करणे गरजेचे आहे. दरम्यान सॅमसंग, एलजी आणि शाओमीचे स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्ससाठी धोक्याची घंटा आहे. युजर्सचे फोन हॅक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सॅमसंग, एलजी आणि शाओमी या तिन्ही डिव्हाइसेसच्या मालव्हेअर प्रोगामची माहिती लिक झाली आहे, ज्यामुळे या कंपनीच्या उपकरणांची सुरक्षा कमकुवत झाली आहे. याचा फायदा घेत हॅकर्स तुमचे डिव्हाइस हॅक करू शकतात.

(‘हे’ 5 स्टाइलीश फोन्स 20 हजारांखाली उपलब्ध, ‘5G’सह मिळत आहेत अनेक फीचर्स)

गुगल अँड्रॉइड पार्टनर वल्नरेबिलिटी इनिशिएटिव्हच्या (APVI) अहवालानुसार, नवीन त्रुटी मॅलेशियस प्रोग्रामला प्रभावित डिव्हाइसच्या सिस्टिममध्ये छेडछाड करण्यास अनुमती देऊ शकते. अँड्रॉइंड ओईएमद्वारे वापरली जाणारी साईनिंग की लिक झाली आहे. याच ‘की’च्या माध्यमातून ऑपरेटिंग सिस्टिममध्ये साइन इन केले जाते.

स्मार्टफोन कंपन्या डिव्हाइसमध्ये साइन इन करण्यासाठी एक की सुनिश्चित करतात, जी अँड्रॉइडसाठी फायदेशीर आहे आणि अँड्रॉइड ओईएमद्वारे बनविली जाते. याच ‘की’च्या मदतीने वेगवेगळ्या अ‍ॅप्समध्ये साइन इन करता येते. ही की आता स्कॅमर आणि हॅकर्ससाठी उपलब्ध असल्याने हॅकर्स या त्रुटीचा फायदा घेऊन वापरकर्त्यांच्या डेटामध्ये प्रवेश मिळवू शकतात.

(फेसबूक डेटिंगवर ‘AI FACE SCANNING’द्वारे कळणार वय, फीचर आणण्यामागे ‘हे’ आहे कारण)

या कंपन्यांची की झाली लिक

एपीव्हीआयने आपल्या रिपोर्टमध्ये कंपन्यांची लिस्ट दिलेली नाही. मात्र, सॅम्पल व्हायरस टोटलवर अपलोड केल्यानंतर की सॅमसंग, एलजी, मीडियाटेक, रिवोव्ह्यू आणि एसझेडआरओसीओ सारख्या कंपन्यांची असू शकते, असे समजले आहे.

सुरक्षेसाठी करा हे उपाय

गुगलनुसार, ही समस्या या वर्षी मे महिन्यात समोर आली होती, ज्यानंतर सॅमसंगसह अनेक कंपन्यांनी त्यास नियंत्रित करण्यासाठी महत्वाची पावले उचलली होती. सुरक्षेसाठी युजरला फोन अपडेट करणे आवश्यक आहे. युजरने थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करणे टाळावे.