Football gif on whatsapp : कतारमध्ये FIFA World Cup 2022 सुरू झाले असून चाहत्यांमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता आहे. भारतीय चाहते आपले आवडते खेळाडू, संघ आणि मोठ्या घटनांवर नजर ठेवून आहेत. या वर्षी विश्वचषक विजेता कोण होणार? कोणत्या खेळाडूची कामगिरी चांगली आहे? याविषयावर सोशल मीडियावर फुटबॉल चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. तुम्हाला जर ही चर्चा आणखी मजेदार करायची असेल, तर यासाठी तुम्ही फुटबॉलसंबंधी व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सचा वापर करू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही फिफा जीआयएफ आणि स्टिकर्सचा वापर करून स्पर्धेबाबतच्या तुमच्या भावना अजून प्रभावीपणे मांडू शकता. व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स डाऊनलोड कसे करायचे? आणि ते ग्रुप आणि वैयक्तिक चाट्समध्ये कसे वापरायचे? याबाबत जाणून घेऊया.

फिफा वर्लड कप २०२२ व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर पॅक असे डाऊनलोड करा

(संगणक, लॅपटॉपची गती कमी झाली? डिलीट करा ‘हा’ डेटा, कार्यक्षमता वाढण्यास होईल मदत)

  • गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल प्ले स्टोअरवर जा.
  • फुटबॉल स्टिकर्स किंवा फिफा वर्ल्ड कप स्टिकर्स शोधा.
  • तुम्हाला आवडणारा स्टिकर पॅक डाऊनलोड करा.
  • स्टिकर पॅक अ‍ॅप ओपन करा आणि अ‍ॅड स्टिकर्स टू व्हॉट्सअ‍ॅपवर क्लिक करा.

व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये स्टिकर्स कसे पाठवावे?

  • व्हॉट्सअ‍ॅप उघडा. चॅट किंवा ग्रुपमध्ये जा. येथे मेसेज बॉक्समध्ये उपलब्ध असलेल्या इमोजी आयकनवर टॅप करा.
  • इमोजी सेक्शनमध्ये तुम्हाला स्टिकर पर्याय दिसून येईल, त्यावर टॅप करा आणि नवीन टाकलेले स्टिकर्स शोधा.
  • नवीन स्टिकर्समधील तुमचा आवडता स्टिकर तुम्ही ग्रुपमध्ये पाठवू शकता.

केवळ स्टिकर्सच नव्हे, तर जीआयएफ पाठवूनही तुम्ही प्रभावीपणे आपल्या भावना व्यक्त करू शकता. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर फिफा जीआयएफ शोधू शकता किंवा थर्डी पार्टी अ‍ॅपमधून जीआएफ डाऊनलोड करू शकता. तुम्ही स्वत: देखील जीआयएफ तयार करू शकता. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

(ट्विटर, मेटानंतर गुगलही नोकर कपातीच्या मार्गावर, इतक्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार)

  • आयओएस किंवा अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअ‍ॅप उघडा.
  • ज्या चॅट विंडोमध्ये तुम्हाला जीआयएफ पाठवायचे आहे ती उघडा.
  • चॅट बॉक्समध्ये अटॅचमेंट पर्याय शोधा आणि नंतर गॅलरी हा पर्याय निवडा.
  • तुम्हाला जो व्हिडिओ जीआयएफ बनवून पाठवायचा आहे तो गॅलरीमधून निवडा.
  • व्हिडिओ निवडून त्यास व्हॉट्सअ‍ॅप प्रिव्ह्यू विंडोमध्ये ६ सेकंदांपर्यंत छोटे करा.
  • नंतर प्रिव्ह्यू विंडोमधील जीआएफ आयकनवर क्लिक करून व्हिडिओला सेंड करा.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Send fifa world cup gif and stickers on whatsapp with this tips ssb