Apple Feature Will Let You Share Bag Location With Airlines : अनेकदा आपण फिरायला गेलो की, आपल्याकडून घाई-गडबडीत बॅग हरवते, ट्रेन किंवा बस प्रवासात आपण सामान विसरून जातो किंवा मग सामानाची चोरी तरी होते. अशा वेळी सामान परत मिळेल याची अपेक्षा फारच कमी जणांना असते. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे. कारण- ॲपलने प्रवाशांसाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे, जे तुम्हाला तुमचे हरवलेले सामान किंवा बॅग शोधण्यात मदत करणार आहे.
ॲपलने नवीन फीचर, शेअर बॅग लोकेशन (Share Bag Location) लाँच करण्यात आले आहे, जे युजर्सच्या हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. हे फीचर, आयओएस १८.२ (iOS 18.2) पब्लिक बेटावर उपलब्ध आहे आणि लवकरच आयफोन एक्सएस (iPhone Xs) आणि नवीन मॉडेल्ससाठी ते देण्यात येणार आहे. हे फीचर युजर्सना एअर टॅग्स (AirTags) किंवा इतर फाईंड माय नेटवर्क ॲक्सेसरीजचे स्थान एअरलाइन्ससह थर्ड पार्टीसह सुरक्षितपणे शेअर करण्याची परवानगी देते आणि प्रवासादरम्यान युजर्सना हरवलेल्या वस्तू परत मिळविण्यासाठी एक सोपा मार्ग प्रदान करते.
शेअर आयटम लोकेशनसह (Share Bag Location) युजर्स त्यांच्या iPhone, iPad किंवा Mac वर Find My app मध्ये शेअर करण्यायोग्य लिंक जनरेट करू शकतात. लिंक प्राप्त करणारी व्यक्ती त्याची बॅग वा वस्तू कुठे आहे हे मॅपवर पाहू शकते, जेव्हा वस्तू हलते तेव्हा नकाशावर ते आपोआप अपडेट होते आणि प्रॉडक्ट आपल्याकडे परत आल्यावर शेअर्ड लोकेशन स्वयंचलितपणे डिॲक्टिव्हेट होईल.
शेअर बॅग लोकेशन (Share Bag Location) :
विमान प्रवाशांना सामान शोधण्यात अचूकतेने मदत करणे हे ॲपलच्या या नवीन फीचरचे उद्दिष्ट असणार आहे. त्यासाठी ॲपलने डेल्टा, युनायटेड, ब्रिटिश एअरवेज व सिंगापूर अशा १५ पेक्षा जास्त प्रमुख एअरलाइन्सबरोबर सहकार्य करार करून, आता ग्राहक सेवा प्रक्रियेमध्ये ‘शेअर आयटम लोकेशन’ समाविष्ट केले आहे. २०२४ च्या अखेरीस या एअरलाइन्स अचूक सामान शोधण्यात मदत करण्यासाठी Find My लोकेशन डेटाला सपोर्ट करण्याची योजना आखत आहेत, ज्यामध्ये अधिक एअरलाइन्स कालांतराने सामील होतील, अशी अपेक्षा आहे.
शेअर आयटम लोकेशन (Share Bag Location) फीचर ॲपलच्या फाईंड माय लोकेशन प्रायव्हसीच्या (गोपनीयतेच्या) फ्रेमवर्कमध्ये काम करते, जे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणि युजर्सची प्रायव्हसी राखते. ॲपलचे म्हणणे आहे की, डेटा सुरक्षा हे या फीचरचे मुख्य केंद्र आहे. तसेच सहभागी एअरलाइन्समधील फक्त अधिकृत व्यक्तींना लोकेशनची माहिती पाहण्याची परवानगी आहे. एअरलाइनचा ग्राहक सेवा प्रतिनिधी या डेटाचा उपयोग हरवलेल्या वस्तू ट्रॅक करून, त्यांचे मालकांकडे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू शकतात, ज्यामुळे बॅगेज मॅनेजमेंट अधिक प्रभावी होऊ शकते.
SITA आपल्या WorldTracer सिस्टीममध्ये ‘शेअर बॅग लोकेशन’ फीचर समाविष्ट करण्याची योजना बनवत आहे, जे जगभरातील ५०० पेक्षा जास्त एअरलाइन्स वापरतात. हे फीचर स्वीकारून, Apple आणि SITA यांचा उद्देश बॅगेज मॅनेजमेंट अधिक सोपे करणे, असा असेल. आहे, ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या बॅगेजची चेक-इन करतांना एक मानसिक शांती मिळेल. तसेच या फीचरसह ॲपलला आशा आहे की, जगभरातील प्रवाशांसाठी हरवलेले सामान शोधण्याची चिंता कमी होईल.