Tech Industry Layoff: गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. याचा भारतातील कंपन्यांनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागला आहे. एका अहवालानुसार शेअरचॅटमध्ये गुगल गुंतवणूकदार आहे. त्यांनी घोषणा केली आहे की यातील २० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येईल. मात्र शेअरचॅट ही काही एकमेव टेक कंपनी नाही की ज्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केलेली आहे. इतर प्रमुख कंपन्यादेखील अशीच कर्मचाऱ्यांची कपात करत आहे तर काही त्याबद्दल विचार करत आहेत.या कंपन्यांना लॉकडाउनचा बसलेला फटका व त्यानंतर त्यांचे वाढलेले खर्च यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठीसुद्धा अशी कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येत आहे. गोल्डमन सॅक्सनेही भारतातील जवळपास ७०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. तर त्या कोणकोणत्या कंपन्या आहेत ते आपण पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Nokia T21 Tablet: नोकियाने लाँच केला १०.३ इंचाचा डिस्प्ले असणारा टॅबलेट; ‘या’ तारखेपासून विक्रीला होणार सुरुवात

ShareChat

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात शेअरचॅट कंपनीने ५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. नवीन वर्षात सुद्धा कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. शेअरचॅट आणि मोज या मूळ कंपन्यांची मोहाला टेक ही कंपनी आहे. यामध्ये २० टक्के किंवा ४०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार आहे.

Ola

ओला या कंपनीने त्यांच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून ओला कॅब, ओला इलेक्ट्रिक, ओला फायनान्शिअल सर्व्हिसेस व्हर्टिकलमधून २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची सुरुवात केली आहे. सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले होते. कंपनीने आपले लक्ष हे आता अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळवले आहे. ओला कंपनी तिच्या इलेक्ट्रिक व्हर्टीकलसाठी ५००० इंजिनिअर्सची नियुक्ती करू शकते.

हेही वाचा : बड्या ‘टेक’ कंपन्या इतकी घाऊक कर्मचारी कपात करतात, हे लक्षण कशाचं?

Amazon

१८ जानेवारी २०२३ पासून १८००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याचे Amazon ने अलीकडेच जाहीर केले होते. अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे हे करावे लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे होते. नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या घोषणेपेक्षा ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

Byju’s

EdTech जायंट बायजूस या कंपनीने कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी मार्च महिन्यात ५ टक्के म्हणजे ५०,००० कामगारांची कपात करण्याचे जाहीर केले होते. कंपनीने केरळमधील मीडिया कंटेन्ट विभागातील सुमारे १०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांची कपात ही प्रतिकूल व्यापक आर्थिक घटकांवर झालेल्या परिणामांमुळे आहे असे कंपनीचे सीईओ बायजा रवींद्रन म्हणाले.

हेही वाचा : मोठी बातमी! लाँच होण्याआधीच iPhone 15 ची किंमत झाली लीक

Dunzo

फास्ट ग्रोसरी वितरित करणारी कंपनी डुंझोने कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी ३ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी टीमच्या स्ट्रक्चर व नेटवर्कच्या डिझाइनकडे लक्ष देत आहे असे कंपनीचे सीईओ कबीर बिस्वास म्हणाले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharechat amazon upgrad ola dunzo ample dunzo companies have reduced their employees tmb 01