गेल्या काही महिन्यामध्ये जागतिक आर्थिक मंदीचा फटका अनेक दिग्गज टेक कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे टेक क्षेत्रामध्ये मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी व आर्थिक मंदीमुळे आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple, Amazon अशा आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच गुगल समर्थित असणारी भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ShareChat कंपनीचा देखील यामध्ये समावेश आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला शेअरचॅट कंपनीने सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी या कपातीबद्दल बोलण्यासाठी पुढे आले आहेत. तसेच त्यांनी आपले अनुभव Linkden वर शेअर केले आहेत. त्यामध्ये काही लोक नवीन संधीची वाट बघत असल्याचे सांगत होते तर, काही जण हे पूर्वीच्या कंपनीबद्दलच सांगत होते.
हेही वाचा : Amazon layoffs: कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढले; आता ‘इतक्या’ लोकांची होणार कपात, कारण…
शेअरचॅटमधील नोकरी गेलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने अलीकडेच आपले अनुभव लिंकडेनवर सांगितले आहेत. बंगळुरू मधील ही महिला ऑक्टोबर २०२१ पासून शेअरचॅटमध्ये काम काम करत होती.
शेअरचॅटमध्ये कर्मचारी कपात झाल्यानंतर ज्या महिला कर्मचाऱ्याने आपले अनुभव शेअर केले आहेत . प्रियांका चक्रवर्ती असे त्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रियांका यांनी लिंकडेन पोस्टमध्ये म्हटले, मी गेल्या दोन महिन्यांमध्ये नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केला आहे. मात्र नशिबाची साथ मिळत नाही आहे. यामुळे तिला मानसिक तणाव आला आहे.सारखे हे करून मी मानसिकरित्या थकलेली आहे. अजून तो दिवस येण्याची वाट बघत आहे ज्या दिवशी माझा हा संघर्ष संपेल.
प्रियांका त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हणाल्या, नोकरीसाठी अर्ज केल्यावर कधीकधी HR काढून कॉल येतात. ते तासंतास मुलाखत घेतात. मी एक चांगली उमेदवार आहे अशी आशा ते मला देतात. मात्र त्यानंतर एकही फोन किंवा ईमेल येत नाही. सकारात्मक गोष्टींना प्रतिसाद मिळत नाही. अशा वेळी खूप निराशा येते.
ShareChat ने यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. सोशल मीडिया प्लेटफ्रॉम असणाऱ्या या कंपनीच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले, आम्हाला एक कंपनी म्हणून आमच्या इतिहासातील काही सर्वात कठीण आणि वेदनादायक निर्णय घ्यावे लागले. यामध्ये आमहाला आमचे २० टाके कर्मचाऱ्यांची कपात करावी लागली.