गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाचे प्रीपेड प्लॅन २५ टक्क्यांपर्यंत महाग झाले. नुकतंच एरटेलने सांगितले आहे की २०२२मध्ये ते आपले प्लॅन्स आणखी महाग करतील आणि याची सुरुवात करण्यात ते अजिबात संकोच करणार नाहीत. एरटेल आपला सरासरी महसूल प्रति वापरकर्ता (एपीआरयू) २०० रुपयांपर्यंत पोहचवण्याच्या प्रयत्नात आहे.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यातही एरटेलने आपले टॅरिफ प्लॅन महाग करायला सुरुवात केली होती. एरटेलचा ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ मध्ये प्रति वापरकर्ता सरासरी महसूल १६३ रुपये होता जो वर्षभरात २.२ टक्क्यांनी खाली आला.
तुमचे आधारकार्ड किती वेळा झाले आहे अपडेट? ‘या’ सोप्या पायऱ्यांचा वापर करून जाणून घ्या
भारती एअरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाळ विठ्ठल म्हणाले, “मला २०२२मध्ये टॅरिफ दरवाढीची अपेक्षा आहे. हे पुढील ३ ते ४ महिन्यांमध्ये होईल. तसेच आम्ही अलीकडील काळात ज्या पद्धतीने नेतृत्त्व केले आहे त्याच पद्धतीने आम्ही येत्या काळात नेतृत्त्व करायला मागेपुढे पाहणार नाही.” तसेच ते पुढे म्हणतात, “आमची एपीआरयू लवकरच २०० रुपये आणि त्यानंतर पुढील काही वर्षांत ३०० रुपयांपर्यंत पोहोचेल अशी आमची अपेक्षा आहे.”
डिसेंबर २०२० च्या तिमाहीत भारती एअरटेलचा एकत्रित महसूल २६,५१८ कोटी रुपयांच्या तुलनेत १२.६ टक्क्यांनी वाढून २९,८९७ कोटी रुपये झाला आहे. एरटेलच्या नेटवर्कवरील डेटा वापरामध्ये ११.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यानंतर डेटा वापर दरमहा सरासरी १८.२८ जीबी प्रति वापरकर्ता झाला आहे, जो एका वर्षापूर्वी १६.३७ जीबी होता.