Friendship Day 2023 Date History: मैत्री हे एक सुंदर नातं आहे, जे तुम्हाला जन्मापासून मिळत नाही, ते आपण स्वतःसाठी निवडतो. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचं नातं खूप खास असतं. खरा मित्र आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा असतो. तुम्ही तुमची स्वप्ने आणि गुपिते खर्‍या मित्रासोबत शेअर करू शकता, ज्याबद्दल तुमच्या जवळच्या लोकांनाही माहिती नसते. ही मैत्री साजरी करण्यासाठी दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

मैत्रीचा खरा अर्थ समजावून सांगण्यासाठी, त्याची भावना जिवंत ठेवण्यासाठी आणि मैत्रीचे क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी दरवर्षी मैत्री दिन साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या मैत्रीबद्दल त्यांच्या मित्रांचे आभार मानतात. ते एकमेकांना फ्रेंडशिप बँड घालतात आणि ही मैत्री कायम ठेवण्याचे वचन देतात. या दिवशी अनेक मित्र एकमेकांना भेटवस्तू देतात आणि त्यांचे महत्त्व दर्शवतात. ३० जुलै म्हणजे कालच जागतिक मैत्रीण दिन साजरा करण्यात आला. भारतात यंदा ६ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे.

Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Indian Army Day 2025 Wishes in Marathi| Happy Indian Army Day 2025
Indian Army Day 2025 Wishes : लष्कर दिनाच्या द्या भारतीय जवानांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश
Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठी भाषेतून खास गोड शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर

जर का तुमच्या मित्राला गॅजेट्स वापरण्याची आवड असेल तर तुम्ही काही तुमच्या बजेटमधील चांगली गॅजेट्स त्यांना भेट देऊ शकता. मात्र यामध्ये काय खरेदी करायचे हे लगेच लक्षात येणे अवघड ठरू शकते. आज तुम्ही तुमच्या मित्राला तुमच्या बजेटमधील आणि त्याच्या उपयोगाची अशी कोणती गॅजेट्स भेट देऊ शकता याबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा : संधी सोडू नका! ‘हा’ आयफोन केवळ १२,७०० रूपयांमध्ये खरेदी करता येणार, इथे करा डील

कस्टम फोन केस

कस्टम फोन केस हे गिफ्ट देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. विशेषतः बालपणीच्या मित्रासाठी. यावर तुम्ही तुमच्या मित्राचा किंवा त्याच्या लहानपणीच्या आवडत्या कार्टूनचा फोटो प्रिंट करून भेट देऊ शकता. हे तुम्ही ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करू शकता. आणि असे अनेक प्लेटफ्रॉम आहेत जे ही प्रॉडक्ट्स थेट तुमच्या मित्राला घरी देखील वितरित करू शकतात.

स्मार्ट सनग्लासेस

जर का तुमच्या एखाद्या मित्राला टेक्नॉलॉजीची आवड असेल तर तुम्ही त्याला स्मार्ट सनग्लासेसची एक जोडी देखील मैत्री दिनाबद्दल भेट देऊ शकता. १ हजार रुपयांपासून ते ३० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे स्मार्ट सनग्लासेस उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्ये बजेटनुसार ते खरेदी करून मित्राला भेट देऊ शकता. उदाहरणार्थ, Razr Anzu हा बाजारातील सर्वात परवडणारा पण चांगले फीचर्स असलेला स्मार्ट सनग्लासेस आहेत. हे ३ हजार रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.

शॉवर ब्लूटूथ स्पीकर

जर का तुमच्या मित्राला अंघोळ करता करता गाणी ऐकण्याची सवय असेल तर तुम्ही त्याला शॉवर ब्लूटूथ स्पिकरदेखील भेट देऊ शकता. शॉवर ब्लूटूथ स्पीकर हा आयपी रेटिंगसह येतो. साधारणतः शॉवर ब्लूटूथ स्पीकर्स १,००० रुपयांपासून उपलब्ध आहेत.

हेही वाचा : अनोळखी नंबरवरून मेसेज आला तर घाबरण्याचे कारण नाही; WhatsApp करतेय ‘या’ फीचरवर काम, वाचा सविस्तर

स्मार्ट ब्लूटूथ ट्रॅकर

आपला एखादा मित्र असा असतोच की त्याला आपल्या वस्तू विसरायची सवय असते. ज्यामध्ये किल्ल्या आणि आपले पाकीट विसरण्याची सवय असते. असे तो विसरू नये म्हणून तुम्ही त्याला स्मार्ट ब्लूटूथ ट्रॅकर भेट देऊ शकता. याची किंमत साधारणतः १ हजार रुपयांपेक्षा कमी असते. हे तुमच्या किचेनशी जोडता येते. फोनसह कॉन्फिगर केल्यावर, वापरकर्ते ट्रॅकरपासून दूर जाताच त्यांना एक अलार्म प्राप्त होईल. या ट्रॅकरमुळे तुमच्या मित्राला चाव्या आणि पाकीट नेहमी जवळ ठेवण्यासाठी मदत करेल.

किंडल ई-बुक रीडर

तुमचा एखादा मित्र असा असतो ज्याला भरपूर फिरायला आवडत असते. तो नेहमीच फिरत असतो. तर त्यांना तुम्ही ईबुक रीडर भेट देऊ शकता. ठराविक टॅबलेटशी याची तुलना केल्यास ई-बुक रीडरची बॅटरी जास्त काळ टिकते. ई-इंक डिस्प्ले हे तंत्रज्ञान कोणत्याही स्थितीमध्ये डोळ्यांवर ताण न येत आवडते पुस्तक वाचण्यास मदत करतात. Amazon जगातील सर्वोत्कृष्ट ई-पुस्तक वाचक बनवते आणि किंडल लायब्ररीमध्येही ई-पुस्तकांचा मोठा संग्रह आहे.

Story img Loader