सध्या स्मार्टफोनमुळे अनेक कामं सोपी झाली आहेत. घरातील लाईट बिल भरण्यापासून ते ऑफिसमधील काही कामं करणे घरबसल्या शक्य झाले आहे . त्यामुळे विविध मोबाइल कंपन्यासुद्धा नवनवीन स्मार्टफोन्स ग्राहकांसाठी बाजारात घेऊन येत असतात आणि त्यात जबरदस्त फीचर्सचा समावेश करत असतात. तर तुम्हीसुद्धा काही दिवसांत लाँच झालेले फ्लॅगशिप स्मार्टफोन्स खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. आज आपण फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची यादी पाहणार आहोत; ज्यात विविध फीचर्सचा समावेश आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा :
सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा हे सर्वात फॅन्सी फ्लॅगशिप मॉडेल आहे, ज्यात एआयचा समावेश असणार आहे. एआयच्या मदतीने यात रिअल टाइम भाषांतर, स्क्रीनवर एखादी वस्तू शोधण्यासाठी फोटो वापरणे, एआय फोटो एडिटिंग आदी वापरकर्त्यांना करता येणार आहे. फ्लॅगशिपमधील ६.८ AMOLED स्क्रीन आणि ५,००० एमएएच बॅटरी, टायटॅनियम फ्रेम (ॲल्यूमिनियमपेक्षा जास्त टिकाऊ), गोरिल्ला आर्मर ग्लास आणि स्नॅपड्रॅगन ८ जनरल ३ चिप, 5x ऑप्टिकल झूम-इन, 50MP टेलिफोटो लेन्स यांसारखे अपग्रेड या मोबाइलला आणखीन आकर्षक बनवते.
ॲपल आयफोन १५ प्रो मॅक्स (Apple iPhone 15 Pro Max) :
ॲपल आयफोन १५ प्रो मॅक्स तुम्हाला एक प्रीमियम अनुभव देईल. ६.७ AMOLED डिस्प्ले व्हिडीओ आणि कामासाठी उत्तम आहे. या फ्लॅगशिपमध्ये आणखी एक खास अपडेट म्हणजे यूएसबी सी (USB-C) पोर्ट – फास्ट ट्रान्सफर , एक्स्टर्नल मॉनिटर सपोर्ट, ॲपल वॉचसारख्या चार्जिंग ॲक्सेसरीज आहेत. तसेच नवीन 5x झूम कॅमेरा आणि A17 प्रो चिप ग्राफिकल परफॉर्मन्सचा यात समावेश आहे.
गूगल पिक्सेल ८ प्रो (Google Pixel 8 Pro) :
कंपनीने गूगल पिक्सेल ८ सीरिज लॉंच केली, त्यात पिक्सेल आणि पिक्सेल ८ प्रो या दोन फोन्सचा समावेश आहे. गूगलच्या या फ्लॅगशिपमध्ये Tensor G3 चिपसेटचा सपोर्ट आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. गूगल पिक्सेल ८ प्रो दोन्ही फोन्स गूगलच्या AI सेवांमध्ये म्हणजेच फोटो अनब्लर आणि लाइव्ह ट्रान्सलेटला सपोर्ट करतात. गूगलचे सात वर्षांचे सॉफ्टवेअर सपोर्टदेखील या फोन्समध्ये आहे.
हेही वाचा…गूगल मीट, झूमला व्हॉट्सॲप देणार टक्कर! युजर्ससाठी लाँच होणार ‘हे’ फीचर
वनप्लस १२ (OnePlus 12) :
वनप्लस १२ मध्ये ६.८२ इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले, यामध्ये ग्राहकांना २के रिजोल्यूशन स्क्रीन मिळेल. फोनचा डिस्प्ले ४,५०० नीट्स ब्राइटनेससह उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Qualcomm Snapdragon 8 Gen 3 ची चिपसेट दिली आहे. यामुळे ग्राहकांना फोनचा वापर अधिक सहजतेने करता येईल. तसेच या फोनची खास गोष्ट अशी की, हा २५ मिनिटांत १०० टक्के चार्ज होतो.
वनप्लस ओपन (OnePlus Open) :
हा वनप्लसचा पहिला फोल्डेबल फोन आहे. कंपनीनं फोनमध्ये दर्जेदार स्पेसिफिकेशन्स दिले आहेत, ज्यात १६ जीबी रॅम, ५१२ जीबी स्टोरेज, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि ड्युअल सेल बॅटरीचा समावेश आहे. यामध्ये Qualcomm चा टॉप टिअर स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन २ चिपचा सपोर्ट देण्यात आला आहे
विवो एक्स १०० प्रो (Vivo X100 Pro) :
या फोनमध्ये ६.७८ इंचाचा LTPO अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात १.५ के पिक्सल रेजोल्यूशन, २०:९ अॅस्पेक्ट रेशियो, एचडीआर१०+, १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, ३००० निट्स पीक ब्राइटनेस आणि २१६० हर्ट्झ पीडब्लूएम डिमिंग सपोर्ट मिळत आहे. विवो एक्स १०० प्रोमध्ये 50MP वाइड एंगल आणि 64MP 3x ऑप्टिकल झूमसह 1-इंच 50MP सेन्सर, नाईट मोड, FuntouchOS 14 स्क्रीनसुद्धा आहे. फोटोग्राफीची आवड असणाऱ्या युजर्ससाठी हा फोन बेस्ट ठरेल.