Apple smart Doorbell : अनेकदा घराबाहेर पडल्यावर किंवा एखाद्या कार्यक्रमातून घरी आल्यावर आठवते की, कुलूप उघडण्याची चावी आपण घरातच विसरून आलो आहे. अशावेळी शेजारच्यांकडे एखादी एक्स्ट्रा चावी असेल तर ठीक, नाही तर दरवाजा उघडण्यासाठी एखादी नवीन चावी बनवून घ्यावी लागते किंवा काही ना काही जुगाड करावा लागतो. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज भासणार नाही.

कारण ॲपल लवकरच दरवाजा अनलॉक करण्यासाठी फेस आयडी वापरण्याची परवानगी देणार आहे. ॲपल नवीन ‘स्मार्ट डोअरबेल कॅमेरा’वर (smart doorbell camera) काम करते आहे, ज्यामुळे दरवाजा अनलॉक करण्यासाठी फेस आयडीचा उपयोग करावा लागेल, असे मार्क गुरमन यांनी ब्लूमबर्गमध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या साप्ताहिक वृत्तपत्रात उघड केले आहे. २०२५ च्या उत्तरार्धात रिलीज होणारे हे डिव्हाइस घरगुती सुरक्षा उपकरणे वापरण्याचा मार्ग बदलू शकते.

Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Image of an iPhone with a USB-C port or a related graphic
iPhone युजर्सची चिंता वाढवणारी बातमी! यूएसबी-सी पोर्टद्वारे हॅक होऊ शकतात फोन, सुरक्षा संशोधकाचा दावा
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा

मार्क गुरमनच्या (Mark Gurman) मते, स्मार्ट डोअरबेल आयफोनवरील फेस आयडीप्रमाणेच कार्य करेल. स्मार्ट डोअरबेल तुम्हाला किंवा घरातील सदस्यांची ओळख पटवून आपोआप दरवाजा अनलॉक करेल (Apple Smart Doorbell). ॲपल इतर उपकरणांप्रमाणे यात सुरक्षित एन्क्लेव्ह चिप हे फीचर टाकणार आहे, जी मुख्य हार्डवेअरपासून बायोमेट्रिक डेटावर प्रक्रिया करते आणि गोपनीयता सुनिश्चित करते, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा…ChatGPT on WhatsApp: व्‍हॉट्सअ‍ॅपवर चॅटजीपीटीचा कसा करायचा वापर? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स; पण असेल ही एक अट

मार्क गुरमन म्हणतात की, डोअरबेल थर्ड पार्टी ‘होमकिट स्मार्ट लॉक’शी पार्टनरशिप करू शकते, जी आधीच इकोसिस्टममध्ये गुंतवणूक केलेल्या ॲपल युजर्ससाठी लवचिकता प्रदान करते. अल्टर्नेटिव्हली ॲपल लाँचच्या वेळी स्मार्ट लॉक (Apple Smart Doorbell) निर्मात्याशी कॉलॅबोरेट करू शकते. हे उपकरण ॲपलच्या इन-हाऊस “प्रॉक्सिमा” चिपचा फायदा घेईल आणि हायब्रीड वाय-फाय आणि ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा फायदा पुढच्या पिढीच्या होमपॉड मिनी आणि ॲपल टीव्ही उत्पादनांसाठी केला जाईल.

हा स्मार्ट डोअरबेल प्रकल्प ‘ॲपल इंटेलिजन्स’ अंतर्गत आपल्या स्मार्ट होम इकोसिस्टमचा विस्तार करण्याच्या ॲपलच्या मोठ्या प्रयत्नांचा एक भाग आहे. डोअरबेलच्या पलीकडे, कंपनी नाविन्यपूर्ण स्मार्ट होम उत्पादनांच्या रेंजवरदेखील काम करत आहे. यामध्ये डिव्हाइसेस, फेसटाइम कॉल्स, व्हिडीओ प्लेबॅक नियंत्रित करण्यासाठी सहा इंच डिस्प्लेसह नवीन स्मार्ट होम हबचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ॲपल हबला पूरक करण्यासाठी एक सुरक्षा कॅमेरा विकसित करत आहे; पुढे त्याच्या ऑफरिंगमध्ये गोपनीयताकेंद्रित फीचर्स समाविष्ट केले जातील.

ॲमेझॉनच्या रिंगला देणार टक्कर (Apple Smart Doorbell) :

फेस आयडी-सुसज्ज डोअरबेल, ॲमेझॉनच्या रिंगला टक्कर देण्याचे काम करणार आहे. पण, हा स्मार्ट डोअरबेल कॅमेरा सुरक्षेच्या चिंतादेखील वाढवतो आहे. स्मार्ट डोअरबेल कॅमेरा खराब झाल्यास अनोळखी व्यक्तींचा घरात प्रवेश यांसारख्या महत्त्वपूर्ण जोखमींना कारणीभूत ठरू शकते. असे असले तरीही ॲपलकडे युजर्सच्या गोपनीयतेला प्राधान्य देण्याचा एक मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आधीपासूनच आहे, त्यामुळे भविष्यात ‘स्मार्ट डोअरबेल कॅमेरा’ कधी लाँच होणार हे पाहणे तितकेच रंजक ठरणार आहे

Story img Loader