एअरटेल पेमेंट्स बँकचे ग्राहक आता ‘एअरटेल थॅंक्स’ या अॅपवर आयसीआयसी लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स (ICICI Lombard General Insurance) कडून स्मार्टफोन विमा खरेदी करू शकतील. यासह एअरटेल पेमेंट्स बँकेने त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध विमा ऑफर आणखी मजबूत केली आहे. ग्राहक आता कागदपत्रांशिवाय सुरक्षित डिजिटल प्रक्रियेद्वारे जलद विमा खरेदी करू शकतात.
डिजिटल युगात स्मार्ट उपकरणांची विशेषतः स्मार्टफोनची मागणी अनेक पटींनी वाढली आहे. आयसीआयसी लोम्बार्डचे स्मार्टफोन इन्शुरन्स सोल्यूशन अपघातांमुळे फोन आणि त्याच्या स्क्रीनला झालेल्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण प्रदान करते. ग्राहक पॉलिसीच्या मुदतीदरम्यान स्मार्टफोन विम्याचा भाग म्हणून जास्तीत जास्त दोन दावे दाखल करू शकतात आणि यामध्ये मोफत पिकअप आणि डिलिव्हरी समाविष्ट आहे, ज्यामुळे ते बाजारात एक अद्वितीय ऑफर बनते.
स्मार्टफोन विमा प्रीमियम किती असेल?
ग्राहकांना १२९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या मासिक प्रीमियमसह स्मार्टफोनच्या खरेदी किमतीएवढी विमा रक्कम मिळू शकते. १०,००० ते १ लाख रुपयांपर्यंतचा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ग्राहक १० दिवसांसाठी हा विमा स्वतः मिळवू शकतात. स्मार्टफोनशी संबंधित तपशील सबमिट केल्यानंतर डिव्हाइस आरोग्य तपासणीशिवाय विमा स्वयंचलितपणे केला जातो.
वापरकर्त्यांना अपघाती नुकसानीपासून संरक्षण मिळेल
आयसीआयसी लोम्बार्डचे कार्यकारी संचालक संजीव मंत्री यांनी सांगितले की, “सध्या देशात ७५० दशलक्ष स्मार्टफोन वापरकर्ते आहेत. ही संख्या २०२६ पर्यंत १ अब्जापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, जी स्मार्टफोन विम्यासारख्या उत्पादनासाठी वाढत्या संधी आणि प्रचंड क्षमता दर्शवते. एअरटेल पेमेंट्स बँक सोबत संरक्षण योजना सादर करताना आनंद होत आहे, जो ग्राहकांना त्यांचा स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास अतिरिक्त संरक्षण प्रदान करेल. हे वापरकर्त्यांना विमा पॉलिसी निवडण्यास प्रोत्साहित करेल.
सुरक्षेची सुरुवातीपासूनच गरज असते
एअरटेल पेमेंट्स बँकेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर गणेश अनंतनारायणन म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन ही आपली जीवनरेखा आहे. स्मार्टफोन आज कनेक्टिव्हिटीपासून फोटोग्राफी आणि बँकिंगपर्यंत जवळजवळ प्रत्येक गोष्टीत आपल्याला मदत करतात. त्याची दुरुस्तीची किंमत सहसा खूप जास्त असते. अशा परिस्थितीत आपल्याला त्याची सुरक्षा अगदी सुरुवातीपासूनच हवी आहे. स्मार्टफोन विमा ऑफर करण्यासाठी आयसीआयसी लोम्बार्ड जनरल इन्शुरन्ससोबत भागीदारी करताना आनंद झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.