Smartphone Price Hike : आपले कोणतेही काम आता स्मार्टफोनशिवाय करणे अशक्य वाटते. महिन्याचा किराणा भरण्यापासून ते सर्व प्रकारची बिलं भरण्यासाठी आपण मोबाईलचा वापर करतो. अशा वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगी पडणाऱ्या मोबाईलचे लेटेस्ट मॉडेल आपल्याकडे असावे असे प्रत्येकाला वाटते. कारण त्यामुळे नव्या फिचर्सचा उपभोग घेता येतो आणि सर्व कामं अधिक लवकर करण्यात मदत होते. त्यामुळे एखादे लेटेस्ट मॉडेल लॉन्च झाले तर तो स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार आपल्या मनात येतो. जर तुम्हीदेखील नवा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर लवकरात लवकर विकत घ्या. कारण काही दिवसांनी स्मार्टफोन महाग होणार आहेत.
लवकरच स्मार्टफोन महाग होणार आहेत. याचे कारण कस्टम ड्युटी असल्याचे बोल्ले जात आहे. भारतात एपेक्स इनडायरेक्ट टॅक्स (Apex Indirect Tax) यांच्याकडून एक ऑर्डर जारी करण्यात आली आहे. मोबाईलमध्ये असलेल्या इनपुटनुसार त्यावर जास्त कस्टम चार्ज आकारला जाईल असे या ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आले आहे. जर मोबाईलमधील घटकांची किंमत वाढली तर कंपन्यांद्वारे मोबाईलची किंमत देखील वाढवण्यात येऊ शकते.
आणखी वाचा – जिओ, एअरटेलला टक्कर देत ‘ही’ कंपनी देतेय फक्त ३२१ रुपयात वर्षभराचा डेटा, कॉलिंग प्लॅन
सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम म्हणजेच सीबीआयसीनुसार (CBIC) एंटीना पिन, पॉवर आणि इतर घटकांना जर डिस्प्लेसोबत जोडले गेले, तर कस्टम ड्युटी चार्ज ५ टक्क्यांनी वाढेल. ज्यामुळे संपुर्ण चार्ज १५ टक्के होऊ शकते. याआधी विवो, ओप्पो यांसारख्या चिनी कंपनींवर हा आरोप करण्यात आला आहे की ते टॅक्स चोरी करतात. टेक कंपन्यांनी यावर असा दावा केला की, सेल्युलर मोबाईलच्या महत्त्वाच्या घटकांवरील कस्टम ड्युटी चार्जवर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. कस्टम ड्युटी चार्जवरुन कंपन्यांकडून यावर वादविवाद सुरू आहे. पण सीबीआयसीनुसार मोबाईलच्या अधिकच्या घटकांवरील एक्सट्रा चार्जमुळे कंपन्यांकडून मोबाईलची किंमत वाढू शकते.