घरात मोबाईल नेटवर्कची समस्या आहे. घरात अशी काही जागा आहे जिथे नेटवर्क येत नाही. अशा परिस्थितीत कॉल करणे किंवा इंटरनेट वापरणे कठीण होऊन बसते. पण या समस्येवर सहज मात करता येते. बाजारात असे एक उत्पादन आहे, ज्यातून तुम्हाला घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पूर्ण सिग्नल मिळेल. कॉल दरम्यान तुम्हाला पुन्हा पुन्हा हॅलो म्हणण्याची गरज पडणार नाही. हे उपकरण खूप स्वस्त असून मोबाईल नेटवर्कच्या तुमच्या सर्व समस्या दूर होतील. चला तर मग जाणून घेऊयात…..

मोबाईल सिग्नल बूस्टर तुमचं काम करेल सोपे

घरबसल्या पूर्ण सिग्नल मिळवण्यासाठी तुम्ही बाजारातून मोबाईल सिग्नल बूस्टर खरेदी करू शकता. हे उपकरण मोबाईल सिग्नल त्वरित वाढवते. हे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर घरातील मोबाईल सिग्नल वाढतो. यानंतर तुम्ही घराच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात जाऊन कॉल करू शकाल आणि इंटरनेट देखील वापरू शकाल.

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल

कमी किमतीत मिळेल मोबाईल सिग्नल बूस्टर

मोबाईल सिग्नल बूस्टर हे एक छोटेसे उपकरण आहे जे हुबेहुब वाय-फाय राउटरसारखे दिसते. हे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. हे उपकरण विकत घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील असे वाटत असेल तर तसे नाही. तुम्हाला हजार ते चार हजार दरम्यान मोबाईल सिग्नल बूस्टर मिळेल. हे उपकरण तुम्हाला घरी लावावे लागेल.

लाइट गेल्यावर बूस्टर बंद होईल

मोबाईल सिग्नल बूस्टर हे उपकरण विजेवर चालणारे आहे, त्यामुळे घरातील लाइट गेल्यास तुमच्या मोबाईल नेटवर्कमध्ये पुन्हा अडथळा येईल. जर तुम्हाला हे मोबाईल बूस्टर ऑनलाइन खरेदी करायचे असेल तर तुम्ही Amazon आणि Flipkart वरून देखील खरेदी करू शकता. तेथे तुम्हाला हे मोबाईल बूस्टर स्वस्त मिळू शकेल.

Story img Loader