Best Smartphones:  जर तुम्हाला १ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन फोन घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका भन्नाट आॅफरबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही अगदी कमी किमतीत फोन खरेदी करु शकता. या आॅफरमुळे महागडे स्मार्टफोन तुम्ही स्वस्तात खरेदी करु शकता. चला तर जाणून घेऊयात कोणते स्मार्टफोन तुम्हाला १ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.

‘हे’ स्मार्टफोन्स घेता येणार स्वस्तात

MOTOROLA g31

Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
tujhyat jeev rangala fame actor amol naik bought a new car
रुपाली भोसलेनंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?
How many options are there to buy gold or jewellery for Diwali
Money Mantra : दिवाळीसाठी सोने वा दागिने घेण्याचे किती पर्याय आहेत?
man light a small rocket using Alexa
“अलेक्सा रॉकेट लाँच कर…” मालकाने सूचना देताच फटाके फोडण्यासाठी Alexa तयार, पाहा दिवाळीचा हा खास VIRAL VIDEO

६ GB रॅम आणि १२८GB अंतर्गत स्टोरेजसह MOTOROLA g31 च्या व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. तुम्हाला या स्मार्टफोनवर १०,४०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे, त्यानंतर तुम्ही हा फोन फक्त ५९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळायला हवा. मोबाईल फोनमध्ये ५००० mAh बॅटरी, ५० मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, १३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ६.४ इंच स्क्रीन आणि Mediatek Helio G85 प्रोसेसर आहे.

(हे ही वाचा : रंगोत्सवाचा आनंद लुटताना स्मार्टफोन खराब होण्याची भीती वाटतेयं? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरा फोन राहिल सुरक्षित )

POCO C55

तुम्ही ६GB रॅम आणि १२८GB अंतर्गत स्टोरेजसह नुकताच लाँच झालेला POCO C55 व्हेरिएंट ५९९ रुपयांना खरेदी करू शकता. या फोनची किंमत १०,९९९ रुपये असली तरी स्मार्टफोनवर १०,४०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. मोबाईल फोनमध्ये ५००० mAh बॅटरी, MediaTek Helio G८५ प्रोसेसर, ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि समोर ५ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

REDMI 10

जर तुम्ही स्वतःसाठी Redmi फोन शोधत असाल, तर REDMI 10 तुमच्यासाठी एक उत्तम फोन असू शकतो. REDMI 10 च्या ४GB RAM आणि ६४GB इंटरनल स्टोरेजसह व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे परंतु तुम्ही फोन स्वस्तात खरेदी करू शकता. या मोबाईल फोनवर ९,४५० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. फोनमध्ये ६००० mAh बॅटरी, ५० मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, ६.७ इंच एचडी प्लस डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसर आहे.

(हे ही वाचा : पुन्हा मिळणार नाही संधी! एकही पैसा खर्च न करता घरी न्या दोन जबरदस्त 5G स्मार्टफोन, फक्त ‘येथे’ मिळत आहे ऑफर )

POCO C31

आणखी एक फोन जो तुम्ही स्वस्तात घेऊ शकता तो म्हणजे POCO C31. स्मार्टफोनच्या ४GB रॅम आणि ६४GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत ८,२४९ रुपये आहे. यावरही तुम्हाला ७,७०० रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट दिली जात आहे. मोबाईल फोनमध्ये ६.५ इंच डिस्प्ले, १३ मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, ५००० mAh बॅटरी आणि MediaTek Helio G35 चा सपोर्ट आहे.

महत्त्वाची सुचना- हे सर्व स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सूचीबद्ध आहेत. जेव्हा तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळेल तेव्हाच तुम्ही हे सर्व स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल तेव्हा तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळेल. म्हणजेच, जर तुम्ही तुमच्या जुन्या फोनची चांगली काळजी घेतली असेल, तर तुम्ही नवीन फोन स्वस्तात खरेदी करू शकता.