Smartphones Launch March 2023 : गेल्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोन क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली आहे. आज लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण मोबाइल फोनचा वापर करत आहेत. फोन ही सध्याच्या काळाची गरज आहे. करोना काळात स्मार्टफोन्स वापरण्याचे प्रमाण वाढत गेले. फोनच्या वाढत्या वापरामुळे त्यांच्या उत्पादन कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळते. किंमत, फिचर, कॅमेरा अशा स्मार्टफोनशी संबंधित गोष्टींमध्ये अपडेट करुन नव्या प्रकारचे मोबाइल फोन दर महिन्याला बाजारामध्ये आल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक कंपनी ठराविक कालावधीनंतर स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. मार्च २०२३ मध्ये लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनची माहिती आपण आज घेणार आहोत…
Moto X40
मोटोरोला कंपनीचा Moto X40 हा मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन मार्च २०२३ मध्ये लॉन्च होण्यार असल्याची माहिती समोर आली होती. याची किंमत ४०,००० रुपये इतकी असू शकतो. या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे. चाळीस हजारांमध्ये येणाऱ्या फोनमध्ये हे प्रोसेसर असणे दुर्मिळ समजले जाते. 6.67 इंच स्क्रीन, 165 Hz रिफ्रेश रेट असणारा हा फोन लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.
Vivo V27/V27 Pro
विवो कंपनीची Vivo V27 सीरिज १ मार्च रोजी लॉन्च केली गेली. कंपनीने या सीरिजमधील V27e, V27 आणि V27 Pro हे तीन स्मार्टफोन्स भारतामध्ये लॉन्च केले. यातील V27e हे बेस मॉडेल आहे. तर V27 हा बजेट व्हेरिएंट आणि V27 Pro हा उत्तम फिचर्स असलेला अपडेटेट स्मार्टफोन आहे. Vivo V27 सीरिजमधील फोनचे 8200 SoC डायमेंसिटी, 8 GB रॅम आणि 6.5 इंच डिस्प्ले ही वैशिष्ट्ये आहेत.
आणखी वाचा – MWC 2023: Xiaomi ने केली वायरलेस एआर ग्लासेसची घोषणा; ‘हे’ आहेत उपयोग, जाणून घ्या
One Plus Nord 3
वन प्लसचा हा स्मार्टफोन मार्च महिन्याच लॉन्च होईल की नाही याबाबत ग्राहक अजूनही साशंक आहेत. कंपनीने One Plus Nord 3 फोन २०२३ च्या पहिल्या काही महिन्यांमध्ये लॉन्च करणार असल्याची अधिकृत घोषणा केली होती. 9000 SoC डायमेंसिटी, 6.7-इंच स्क्रीन आणि 120 Hz रिफ्रेश रेट असे फिचर्स या नव्या स्मार्टफोनमध्ये असू शकतात. २७,९९९ रुपये किंमत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी असणार आहे. तसेच हा फोन 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करु शकेल.
Moto G73
मोटोरोला कंपनीचा आणखी एक स्मार्टफोन या महिन्यामध्ये बाजारात येणार आहे. मध्यम श्रेणीतील Moto G73 फोनमध्ये 930 SoC डायमेंसिटी, 8 GB रॅम, 50 एमपी मुख्य कॅमेरा आणि 16 एमपी फ्रंट कॅमेरा असे फिचर्स असणार आहेत. तसेच यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट असून त्याचा स्क्रीन डिस्प्ले 6.5-इंचाचा असू शकतो असे म्हटले जात आहे. फोनच्या बॅटरीची क्षमता 5000 mAh असून याची किंमत २६,७०० रुपये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Vivo X90 Pro
Vivo X90 Pro या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे. 12 GB रॅम, 50 + 48 + 50 + 64 MP क्वाड कॅमेरा सेटअप, 32 MP फ्रंट कॅमेरा आणि 4700 mAh बॅटरी अशा फिचर्सनी समृद्ध असलेल्या या फोनची किंमत ७४,३९० रुपये इतकी असू शकते. तसेच त्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट असून 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले असणार आहे.