Snapchat new features: सोशल मीडिया वापरायची सध्या खूप क्रेझ आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण वेगवेगळ्या सोशल मीडिया अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करत असतात. स्नॅपचॅट हे एक लोकप्रिय अ‍ॅप्सपैकी एक आहे. स्नॅपचॅटने फिल्टर्स हे प्रसिद्ध फिचर सुरु केले होते. या अनोख्या फिचरमुळे स्नॅपचॅटला खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर इन्स्टाग्राम, फेसबुकसह अनेक कंपन्यांनी त्यांचे अनुकरण केले होते. नुकतीच या सोशल मीडिया कंपनीद्वारे दोन नव्या फिचर्सची घोषणा करण्यात आली.

यातील पहिल्या फिचरचे नाव साउंड रिकमेंडेशन फॉर लेन्सेस असे आहे. या फिचरचा वापर करुन यूजर्स वापरलेल्या लेन्सला पूरक असा आवाज शोधू शकणार आहेत. फोटो किंवा व्हिडीओ तयार करताना लेन्स लावताना साउंडचे चिन्ह स्क्रीनवर दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर मीडियामध्ये गाण्यांची, आवाजांची लिस्ट पाहायला मिळेल. फोटो/व्हिडीओनुसार त्या लिस्टमधील ऑडिओ निवडून वापरु शकता.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
Maharashtrachi Hasya Jatra inside rehearsal video
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘अशी’ होते रिहर्सल! शिवालीने केलं भन्नाट ‘टंग ट्विस्टर’, मालवणी भाषा अन्…; पाहा व्हिडीओ
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
Bollywood actress tripti dimri and shahid Kapoor will be seeon together in Vishal Bhardwaj's action film Arjun Ustra
रणबीर कपूर, विकी कौशलनंतर तृप्ती डिमरी ‘या’ चॉकलेट बॉयबरोबर रोमान्स करताना दिसणार; विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तरा’मध्ये झळकणार ही नवी जोडी

‘साउंड्स सिंक फॉर कॅमेरा रोल हे दुसरे स्नॅपचॅट फिचर आहे. यामध्ये फोटो, व्हिडीओ यांचा मॉन्टेज बनवताना अपलोड केलेल्या गोष्टी ऑडिओवर आपोआप सिंक होणार आहेत. या फिचरमध्ये चार ते वीस फोटो आणि काही व्हिडीओ वापरता येणार आहे. ट्रेंड सुरु असताना व्हिडीओ बनवताना या फिचरची खूप मदत होईल.

नेटफ्लिक्सचा मोठा निर्णय! अ‍ॅमेझॉन प्राईम, हॉटस्टारला टक्कर देण्यासाठी १०० देशांमध्ये कमी केले सबस्क्रीप्शनचे दर

स्नॅपचॅटच्या या दोन नव्या फिचर्सचा वापर सध्या फक्त अमेरिकन नागरिकांना करता येणार आहे. लवकरच जगभरातील यूजर्ससाठी हे फिचर्स अँड्रॉइड आणि आयओएसमध्ये लॉन्च केले जाणार आहेत.

Story img Loader