सध्या नवनवीन स्मार्टवॉचचा जमाना आहे. आता प्रत्येकाच्याच हातात वेगवेगळ्या ब्रँडचे स्मार्टवॉच आपण पाहत असतो. बोट कंपनी आता एक नवे स्मार्टवॉच घेऊन बाजारात आली आहे. आज आपण या स्मार्टवॉचचे फीचर जाणून घेऊया. boAt ने आपले पहिले ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच, boAt Primia लाँच केले आहे. या उत्तम स्मार्टवॉचमध्ये एमोएलईडी डिस्प्ले उपलब्ध आहे. यात अंगभूत स्पीकर, मायक्रोफोन आणि मेटल डिझाइन, चामड्याचा पट्टा देखील मिळतो. याचे रिझोल्यूशन ४५४x४५४ पिक्सेल आहे. यामध्ये बास्केटबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, सायकलिंग, योगा, ट्रेडमिल किंवा फक्त वेगवान चालणे किंवा धावणे यासारख्या खेळांसाठी ११ अॅक्टिव्ह स्पोर्ट मोड आहेत.
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, ब्लूटूथ कॉलिंगसह बोट प्रिमिआ स्मार्टवॉच ३,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत अॅमेझॉनवर आणि बोट वेबसाइटवर उपलब्ध असेल. यानंतर हे घड्याळ ४,४९९ रुपयांना मिळेल. विशेष बाब म्हणजे या स्मार्टवॉचमुळे व्हॉईस असिस्टंटला थेट प्रवेश मिळू शकतो. युजर्स त्यांच्या स्मार्टफोनवर गुगल आणि सिरी व्हॉइस असिस्टंटशी कनेक्ट होऊ शकतात.
आता अॅप न उघडताच होणार पेमेंट; जाणून घ्या Google Pay चे नवे फीचर
प्रिमिआ तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनसह प्ले, पॉज किंवा आवडता ट्रॅक निवडण्याची किंवा फोटो क्लिक करण्याची परवानगी देते. कंपनीचा दावा आहे की त्याची बॅटरी सात दिवस टिकू शकते. यामध्ये मेसेज, ईमेल, नोटिफिकेशन आणि कॉलसाठी स्मार्ट अपडेट्स देण्यात आले आहेत. याशिवाय, बोट प्रिमिआ स्मार्टवॉचमध्ये अंगभूत हृदय गती, एसपीओ २ आणि स्ट्रेस लेव्हल ट्रॅकर, स्टेप काउंट, कॅलरी बर्न रेकॉर्ड यांचाही समावेश आहे. यात स्लीप ट्रॅकर देखील आहे आणि ते युजर्सना स्मार्टपणे झोपण्यासाठी मार्गदर्शन करते.